Home मराठवाडा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण प्रचारक होवूया. – रामेश्वर...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण प्रचारक होवूया. – रामेश्वर तिरमुखे.

276

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

तालुक्यातील सुखापुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण स्वतःच प्रचारक होवूया. असे रामेश्वर तिरमुखे यांनी उपस्थित भीम अनुयायांसह ग्रामस्थांना केले.

या कार्यक्रमाला उपसभापती रईस बागवान,सरपंच भगवानराव राखुंडे,माजी पस सदस्य सुभाष पटेकर व नसीर बागवान,पत्रकार रामदास पटेकर,विष्णू भापकर, गणेश जाधव,सखाराम सातभद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती

बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० ला सर्वप्रथम ओबीसी ही स्वतंत्र ओळख निर्माण केली. ओबीसी हा विषय त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा होता. १९४६ ला त्यांनी स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी केली. हिंदू स्त्रियांची अवनती या शोधनिबंधात ते स्त्रियांना गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठीचे पर्याय नोंदवतात. त्यासाठी ते अग्रक्रमाने कार्य करतात.
हिंदूकोड बील सादर करतात.

पुढे बोलतांना अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सदाचार याबाबत केलेले कार्य दिशादर्शक ठरते आहे.जे पंचशील याचे द्योतक आहे.याचबरोबर बिहार येथे आर एल चंदापुरी च्या नेतृत्वात आयोजित ओबीसी रॅलीची अध्यक्षता डॉ.आंबेडकर करतात. तसेच २५ एप्रिल ला लखनौ येथे आयोजित शेड्युल कास्ट फेडरेशनच्या राष्ट्रीय अधिवेशनात एससीच्या लोकांनी ओबीसी ला अटी शर्ती न ठेवता सहयोग ,सहकार्य करावे, असे आदेशीत करतात. संविधानात ओबीसी साठी अगोदर ३४० कलम मध्ये तरतूद करतात,नंतर एस सी,एस टी ला अनुक्रम पदाचा राजीनामा देतात. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आपण समजून घेणे गरजेचे आहे.

बुद्ध धम्म आचरणात आणून त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने आपला वेळ,बुद्धी,श्रम व पैसा खर्च करावा असेही व्याख्यानात नोंदविले.
प स उपसभापती रईस बागवान यांनी बुद्धविहार मोठे सभागृह करून देण्यासाठी आपण साथ द्यावी अशी विनंती केली.सुभाष पटेकर यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन सचिन गायकवाड सर यांनी केले.कार्यक्रमास महिला आणि पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
यावेळी कार्यक्रमाचे आभार पत्रकार रामदास पटेकर यांनी मानले..