
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव कंटुले यांच्या विशेष प्रयत्नाने भेंडाळा येथील गुप्तेश्वर महादेव मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा नुकताच सुरुवात करण्यात आली.यावेळी श्री कंटुले यांनी सांगितले की,सात लाख रूपयांचा निधी यासाठी उपलब्ध करण्यात आला.यामुळे भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गुप्तेश्वर महादेव मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. गुप्तेश्वर महादेवाची पिंड हि स्वयंभू असून भक्तांच्या मनोकामना येथे पुर्ण होतात.भगवान शिव यांच्या दर्शनासाठी श्रावण आणि शिवरात्री निमित्ताने गर्दी करतात.परिसर निसर्गमय आहे.परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे.भाविक मन:शांतीसाठी येत राहतात. प्रगतशील शेतकरी शिवाजी सुरासे यांनी मोठ्या परिश्रमातून येथे गुप्तेश्वर महादेव मंदिराची स्थापन केलेली आहे. बाजार समितीचे संचालक शिवाजीराव कंटुले यांनी या मंदिराच्या उत्कर्षासाठी विशेष प्रयत्न केले असून भाविकांनी धन्यवाद दिले आहेत.याप्रसंगी शेतकरी शिवाजी सुरासे,शिवाजी राऊत, आप्पासाहेब कंटुले,राजाभाऊ कंटुले,श्रीरंग सुरासे यांची उपस्थिती होती. सुरासे बंधुंनी उपस्थितांचे स्वागत केले.











































