Home मराठवाडा सध्याच्या परिस्थितीमध्ये ब्रह्माकुमारीजचे तत्वज्ञान आणि मेडिटेशनची आवश्यकता, जीवन नक्किच बदलते – राजेश...

सध्याच्या परिस्थितीमध्ये ब्रह्माकुमारीजचे तत्वज्ञान आणि मेडिटेशनची आवश्यकता, जीवन नक्किच बदलते – राजेश टोपे

159
0

 

जालना -लक्ष्मण बिलोरे

ब्रह्माकुमारीजच्या तत्वज्ञानाने अनेकांचे जीवन बदलताना मी पहिले आहे. त्यांचे जीवन सुखी-शांत समाधानी बनतांना पहिले आहे. जगभरामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम कोणी करत असेल तर ती ब्रह्माकुमारी संस्था आहे. मेडिटेशनने एनर्जी घेऊन आपले जीवन कार्य केले तर निश्चितच समाजाचे परिवर्तन होईल. कोविड मध्ये काम करत असतांना अनेक अनुभव आले आहे. त्यावरून समजते की सध्याच्या परिस्थीतीमध्ये ब्रह्माकुमारीजचे तत्वज्ञान व मेडिटेशनची आवश्यकता आहे असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय,प्रियांका रेसिडेन्सी,मंठा चौफुली,जालना येथील राजयोग भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.राजेश टोपे यांनी केले.


याप्रसंगी ब्रह्माकुमारीज मुख्यालय माउंटआबू (राज.) येथील अतिरिक्त मुख्य प्रशासिका तथा महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व तेलंगाना मुख्य प्रशासिका राजयोगिनी संतोषदीदी, आमदार कैलास गोरंटयाल,नगराध्यक्ष संगीता गोरंटयाल, बुऱ्हानपूर क्षेत्राच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी मंगलादीदी, ब्रह्माकुमारीज नाशिकच्या मुख्य संचालिका वासंतीदीदी,अनिता अग्रवाल,जालना सेवाकेंद्राच्या मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी सुलभादीदी या प्रमुख मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. राजयोगभवनाची कोनशीला अनावरण व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु.शिवानी ढोरे,देऊळगावराजा,संस्कार सोनावणे व कु.पियू दराडे यांनी सुंदर स्वागत नृत्य सादर केले.
संतोषदीदी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कि, लोकप्रतिनिधी समाज सेवा,देश सेवा करतात पण स्वतःसाठी,स्व-परिवर्तनासाठी वेळ देत नाही. परिवर्तन करण्यासाठी आध्यात्मिकतेची आवश्यक आहे. मेडिटेशन शिकण्यासाठी हे राजयोग भवन निर्माण केले आहे.विपरीत परिस्थीतीमध्ये परमात्म्याचे ध्यान करणे आवश्यक आहे. हिम्मत ठेवल्याने ईश्वराची मदत मिळते. याप्रसंगी आमदार कैलास गोरंटयाल यांनी मंठा चौफुली रोड पासून ते ब्रह्माकुमारी विद्यालया परियंत सेंटर रोड बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मंत्री राजेश टोपे यांना केली व रोडचे काम करण्याबाबत आश्वासन मंत्री टोपे यांनी दिले.
सविता लोया,मंगला मालपाणी,निर्मला साबू,पूनम स्वामी,परवीन आनंद,विधिज्ञ सतीश तवरावाला,विनीत सहानी,सुनीलभाई रायठठा,सुनील लाहोटी,गोवर्धन अग्रवाल,अंकुश राऊत,आर. आर.खडके,ज्ञानदेव पायगव्हाणे, सुषमा पायगव्हाणे विधिज्ञ राम गव्हाणे, डॉ.संदीप शेळके,लक्ष्मीनारायण मानधना,विजय जोशी,योगेश अडाणी,डॉ.शेख आतिक, लक्ष्मीकांत कंकाळ,सूर्यप्रकाश उजवणे या मान्यवरांनी संतोषदीदीच्या नागरी सत्कार केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी केले तर आभार विधिज्ञ वीणा साबू यांनी मानले. राज स्वामी,डॉ.सतीश मोरे,अभय सहानी,परमानंद धनकानी, डॉ.सुरेश मणियार,डॉ.शिल्पा मणियार,मोहन दिवटे, विधिज्ञ सुरेश सोळुंके,शिवाजी म्हस्के यासह जिल्यातील ब्रह्माकुमारी परिवारातील साधक मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतलदीदी,मीरादीदी,रेखा दीदी,शकूदीदी, अनितादीदी,सुनंदा दीदी,अर्चनादीदी,मनोज जैस्वाल,विजय जोशी,कल्पना लाहोटी,भारती मोरे,छाया डागा,सुनिता सहानी,शकुंतला सोनवणे,साधना साळुंके यांनी परिश्रम घेतले.

Previous articleअन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषणाचा पहिला दिवस
Next articleस्विफ्ट कार सह 4,37,800/- रु. चा विदेशी दारूसाठा जप्त
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.