Home विदर्भ ..अन् त्या पिडीतांना अखेर त्यांचा हक्क मिळाला.

..अन् त्या पिडीतांना अखेर त्यांचा हक्क मिळाला.

225

बाळा जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश…!

इकबाल शेख – वर्धा

आर्वी :- गेल्या काही महिन्यांआधी आर्वी येथील स्थानिक बँक ऑफ इंडिया मधील बँक मित्राने अनेक गोरगरीब, महिला, मजूर, शेतकरी यांचे खात्याशी परस्पर व्यवहार करून सर्व मिळून करोडो रुपयांचा अपहार केला होता. त्या सर्व आर्थिक फसवणूक झालेल्या ग्राहकांना बाळा जगताप यांच्या प्रयत्नामुळे मदतीचे पैसे काही ग्राहकांना आज मिळाले आहे. याच प्रकारे १५ – १५ ग्राहकांना टप्याटप्याने पैसे मिळेल एक ते दीड महिन्यात सर्वांना पैसे मिळणार आहे. त्याची सुरवात आज पासून झाली आहे.
सविस्तर असे की बँक ऑफ इंडिया आर्वी मधील हा गैरव्यवहार प्रहारचे बाळा जगताप यांनी चव्हाट्यावर आणून त्या बँकमित्राची चांगलीच धुलाई केली होती. या सर्व प्रकरणात ज्या खातेधारकांची आर्थिक लूट झाली होती. त्या सर्व खाते धारकांना त्यांचे सर्व पैसे परत मिळावे याकरिता बाळा जगताप यांनी शर्थीचे प्रयत्न केले. सतत बँकेशी या प्रकरणाबाबत पाठपुरावा केला. प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका सुद्धा घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत बँकेचे एसडीएम श्री. वैभव लहाने व शाखा व्यवस्थापक श्री. पुरुषोत्तम सवई यांनी सर्व प्रकरणाची चौकशी करून सर्व गरजूंना त्यांचे पैसे देण्यात येईल असे सांगितल्यानंतर आज सर्व चौकशीअंती सर्व आर्थिक लूट झालेल्या ग्राहकांना पैसे भेटण्यास सुरवात झाली आहे. हे सर्व पैसे टप्प्याटप्याने मिळणार असून सर्व खातेधारकांना संपूर्ण पैसे मिळणार असून सर्व पैसे मिळायला एक ते दीड महिना लागू शकतो. बाळा जगताप यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता सर्व फसवणूक झालेल्या ग्राहकांना पैसे परत मिळणार असल्याने खातेधारकांच्या शिष्टमंडळाने बाळा जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
तसेच या सर्व प्रकरणात बँकेचे एस डी एम वैभव लहाने व शाखाव्यवस्थपक पुरुषोत्तम सवई यांनी लक्ष घालून काम केले त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले.
सदर बँकेतील आर्थिक लुबाडणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे त्यांना परत मिळवून देऊ शकलो आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद हा नक्कीच आमच्यासाठी कोणत्या पुरस्कारापेक्षा कमी नाही असे बाळा जगताप यांनी सांगितले.