Home मराठवाडा पत्रकारितेच्या भुमिकेत ‘ मेख ‘ नसली पाहिजे- विनायक चोथे

पत्रकारितेच्या भुमिकेत ‘ मेख ‘ नसली पाहिजे- विनायक चोथे

148
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

पत्रकारिता लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून मोठी जबाबदारी आहे.पत्रकारितेमध्ये मोठी ताकद आहे परंतु या ताकदीचा कुठे आणि कसा वापर करायचा हे ज्या त्या पत्रकारांवर अवलंबून आहे.प्रशासन, राजकीय नेते ‘चांगला पत्रकार’ म्हणत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड आहे असे समजले पाहिजे.पत्रकारिता हि कडवट आणि निर्भिड असली पाहिजे, पत्रकारितेच्या भुमिकेत
‘ मेख ‘ नसली पाहिजे अशी भावना संत रामदास महाविद्यालयाचे सचिव विनायक चोथे यांनी व्यक्त केली.
पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयात ७ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने उत्साहपूर्ण वातावरण होते.व्यासपीठावर प्राचार्य डॉ.आरके परदेशी, रामभाऊ लांडे, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुभाष बीडे, किशोर शिंदे,नरेंद्र जोगड, सतीश केसकर यांची उपस्थिती होती.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारिता समाजाचा आरसा आहे,पत्रकारितेचे महत्त्व,बदलते स्वरूप,प्रकार आणि जबाबदारी याबाबत दिलखुलास संवाद साधताना प्राचार्य परदेशी, पत्रकार राम लांडे, सुभाष बीडे, राजकुमार वायदळ, अमोल मोटे , महेश कुलकर्णी, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुत्रसंचलन प्रा.प्रमोद जायभाये यांनी केले तर महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले.कार्यक्रमास अंबड-घनसावंगी तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती होती.