
रावेर (शेख शरीफ)
सोशल मिडिया जेवढे चांगले तेवढे घातक आहे . सध्याची पत्रकारिता कठीण आहे . हल्ले, ब्लॅकमेल, धमक्यामुळे पूर्वीच्या पत्रकारिते पेक्षा हाताची पत्रकारिता डगमगत असल्याचे चित्र दिसत आहे.या मुळे पत्रकारांमध्ये विश्वासार्हता असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी येथे बोलतांना व्यक्त केले . येथील दर्पण पत्रकार फाऊंडेशन. पत्रकार दिलीप वैद्य (सकाळ),चंद्रकांत विचवे ( देशदूत), किरण चौधरी (लोकमत), वासू नरवाडे (दिव्यमराठी), कुमार नरवाडे (सामना), प्रकाश पाटील (पुण्यनगरी) निलेश राजपूत यांच्या तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिरातील रा . का . पवार सभागृहात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती निमित्त व पत्रकार दिना निमित्त एक तालुका स्तरीय उत्कृष्ट काम करणारे पाच ग्रामीण भागातील व एक तालुका प्रतिनिधी शहरी भागातील अशा सहा पत्रकारांना उत्कृष्ठ पत्रकार सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले . यावेळी खा श्रीमती रक्षा खडसे अध्यक्ष स्थानावरुन बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, एखाद्याच्या चुकीच्या व खोट्या बातमीने कोणाचे आयुष्य उध्वस्त होऊन जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे समाजातील चांगल्या, वाईट घडामोडी ,वस्तु निष्ठ लिखाण करून पत्रकारांनी समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न लेखणीतून करावा . सध्या डिजीटल पत्रकारीचा काळ आहे . पूर्विची व आताची पत्रकारीता नविन तंत्रज्ञानावर आधारीत आहे . पत्रकारांनी याचा वापर समाज हिता साठी करावा. माजी आमदार अरुण पाटील म्हणाले की लोकशाहित पत्रकारांचे योगदान महत्वाचे आहे. आपला प्रपंच सांभाळून निकोप पत्रकारीता करावी . प्रिंट मिडीयावर विश्वासार्हता अधिक आहे . पत्रकारांनी विधायक, निस्पृहपणे समाजमन तयार करण्याचे काम पत्रवारीतेतून करण्याचे आवाहन त्यांनी केले . प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मनोगत व्यक्त केले . खा. रक्षा खडसे,जि . प . अध्यक्षा रंजना पाटील माजी आमदार अरुण पाटील, मावळते नगराध्यक्ष दारामोहंमद, प्रांताधिकारी कै लास कडलग, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचे हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते तालुकास्तरीय पुरस्कार प्रदीप वैद्य रावेर (सकाळ ), ग्रामीण पत्रकारात राजेंद्र भारंबे चिनावल, प्रविण पाटील सावदा ( सकाळ ), कैलास लवंगडे सावदा ( पुण्य नगरी ), दिलीप महाजन वाघोड (दिव्य मराठी ),रविंद्र महाजन कोचूर (देशदूत ) यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाल , श्रीफळ, शाल, गुच्छ, प्रमाण पत्र व देवून पुरस्काराने गौरवण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील ,शिवसेना तालुकाप्रमुख योगीराज , भाजपा तालुका अध्यक्ष राजन लासूरकर, माजी नगराध्यक्ष हरीश ,डॉ . राजेंद्र पाटील, गोंडू महाजन, दिलीप कांबळे, युसुफखान, शेख गयास, बाळू शिरतुरे , मुंजलवाडीचे सरपंच योगेश पाटील, संदीप सावळे,डॉ . सुरेश पाटील, अमोल गणेश महाजन डॉ . संदीप पाटील, डॉ. योगेश पाटील, डॉ . भगवान कुयटे,डॉ राजेंद्र आठवले, डॉ . दत्तप्रसाद दलाल, डॉ अनिकेत , पद्माकर महाजन, प्रदीप सपकाळे, पि के महाजन, शैलेंद्र देशमुख ,प्रा . व्ही व्ही पाटील अशोकशेठ वाणी, विकास देशमुख, पत्रकार देवलाल पाटील, योगेश सोनवणे, प्रविण पाटील, प्रशांत बोरकर, श्री भागवत. यांचे सह पत्रकार व नगारीक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे नियोजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, पत्रकार किरण चौधरी, निलेश पाटील कुमार नरवाडे, रविंद्र महाजन, गणेश शेटी यांनी केले . प्रास्ताविक दिलीप वैद्य, सुत्रसंचालन चंद्रकांत विचवे, परिचय व आभार वासुदेव नरवाडे यांनी मानले .











































