Home विदर्भ पारवा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस रेझिंग डे २०२२ साजरा.

पारवा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस रेझिंग डे २०२२ साजरा.

271

पारधी समाजातील विजूने अनुभवले ठाणेदाराचे कामकाज
———————————-
पदोन्नती झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार
———————————-

यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन येथे २ जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पहिल्यांदाच पोलीस रेझिंग डे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
“पोलीस रेझिंग डे २०२२”या निमित्ताने पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रघुनगर घोटी येथिल पारधी समाजातील कर्तृत्ववान आदिवासी युवक विजू गुलाब राठोड याला ठाणेदार विनोद चव्हाण यांनी या दिनी ठाणेदाराच्या कामकाजाची ओळख व्हावी हा उद्देश पुढे ठेवून ठाणेदार पदाचा कार्यभार सोपवून त्यांना कामकाजाविषयी माहिती देत. त्याचा सत्कार करण्यात आला. याशिवाय रघुनगर घोटी येथिलच दुसरे युवक नितिन यमन राठोड यांचे कडे पोलीस ठाणे अमलदार पदाचा कार्यभार सोपविले होते. दोन्ही युवकांनी पारवा पोलीस स्टेशनचे कामकाज सुरळीत समजावून घेतले. असा आगळा वेगळा कार्यक्रम ठाणेदार विनोद चव्हाण यांनी राबविल्याने परिसरात स्तुती केल्या जात आहे. असा उपक्रम जवळपास जनतेनी शिक्षक दिनी शाळेतच राबविताना बघितले आहे. बहुतांश शाळेत शिक्षक दिनी शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक यांचे सह शिक्षक बनवून कामकाज करण्याचा अनुभवाचा धडा दिला जातो. असाच एक दृष्टीकोन पुढे ठेवून ठाणेदार चव्हाण यांनी या आदिवासी समाजातील कर्तृत्ववान युवकांना या महत्त्वाच्या पदाचा परिचय करून दिला. यातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावेत यातून ते मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असा मानस पुढे करून हा उपक्रम यशस्वी राबविण्यात आला. आणि ते आम्ही नक्की करू असा संकल्प या युवकांनी यावेळी केला.
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपिठात नाव लौकिक करणारे विजू राठोड सारखे ज्ञानी व कौशल्य धारक विद्यार्थी ग्रामीण भागात आहे हे दिसून आले असून यापुढे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुध्दा प्रेरणा घ्यावी असा मोलाचे संदेश यातून पोहोचविला आहे.
सोबतच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी पोलीस दलातील पोलीस अमलदाराना नववर्षाच्या महूर्तावर पदोन्नती दिलेले एएसआय. संजय पांडे, सुनिल कुडमथे, पोलीस हवालदार संदीप महाजन, लखन राठोड, पोलीस नाईक राहुल राठोड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ठाणेदार विनोद चव्हाण रामकृष्ण चौके, अविनाश मुंडे, निर्मळ राठोड, तुषार जाधव, स्वप्नील सलाम, रंजना वाटगुरे, राजु दाडेवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.