Home विदर्भ घाटंजी पंचायत समितीने 15 व्या वित्त आयोगाची दुसर्‍यांदा काढलेली ई निविदा तात्काळ...

घाटंजी पंचायत समितीने 15 व्या वित्त आयोगाची दुसर्‍यांदा काढलेली ई निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी..!

523

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे सखोल चौकशीचे आदेश..?

( अयनुद्दीन सोलंकी )

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी पंचायत समिती अंतर्गत 15 व्या वित्त आयोग अंतर्गत सुट्टीच्या दिवशी ई निविदा काढल्याने घाटंजी पंचायत समितीच्या अध्यक्ष व सचिवाने सदरची नियमबाह्य ई निविदा तात्काळ रद्द करुन शासन निर्णयानुसार नविन ई निविदा काढण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य आशीष सुरेशबाबू लोणकर, सरीता मोहन जाधव, पावणी रुपेश कल्यमवार, पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे व नयना जिवन मुद्देलवार आदींनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडघे, घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर आदींकडे समक्ष, ई-मेल व आवक जावक कक्षात लेखी तक्रारीद्वारे केली आहे. दरम्यान, घाटंजी पंचायत समितीने काढलेल्या ई निविदा प्रक्रिया प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीधर पांचाळ यांनी सखोल चौकशीचे आदेश दिल्याची माहिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी दिली आहे. घाटंजी पंचायत समीतीची ई निविदा काढतांना तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष हे पंचायत समितीच्या सभापती निता आकाश जाधव तर सचिव म्हणून गट विकास अधिकारी ह्या असुन पहीली ई निविदा तालुकास्तरीय समितीच्या अध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती निता आकाश जाधव, सचिव म्हणून गट विकास अधिकारी यांनी काढली होती. मात्र, त्यात तिसर्‍या ई निविदाधारक नायनवार यांनी ई निविदा दाखलच केली नसतांना त्यांचे नांव तिसर्‍या क्रमांकावर नोंदविण्यात आले होते. त्यांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे तोंडी आक्षेप नोंदविल्याने त्यांचे नांव ई निविदा मधुन वगळुन तिसरे नांव ई निविदाची मुदत संपल्यानंतर समाविष्ट करण्यात आले, असा आरोप करण्यात येत आहे. सदरची वादग्रस्त निविदा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे समजते. तसेच आपल्या जवळच्या कंत्राटदार, पुरवठादार व विशिष्ट कंपनीला सदरचे काम मंजुर करण्यासाठी नियमबाह्य ई निविदा काढण्यात आल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे निविदेतील मुद्दा क्रंमाक 27 हा पुर्णत: नियमबाह्य असुन अध्यक्ष व सचिवचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट त्यात स्वमर्जीने समाविष्ट केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर यांनी केला आहे. विशेषतः 27 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार ई निविदा फी व अनामत रक्कम हे डिमांड ड्राफ्ट किंवा F.D.R. आँनलाईन द्वारे खात्यात जमा करायचे असतांना सदर खाते क्रमांक घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात येऊन घेऊन जाण्याची अट नियमबाह्य टाकण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या पावतीताई रुपेश कल्यमवार हिने केला आहे. तथापि, तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष व सचिवाने ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष पंचायत समितीच्या सभापती निता आकाश जाधव असून सचिव म्हणून गट विकास अधिकारी ह्या आहेत. कारण या पुर्वी पंचायत समिती कडुन काढण्यात आलेल्या पहील्या ई निविदा मध्ये अध्यक्ष म्हणून पंचायत समितीच्या सभापती निता जाधव व सचिव म्हणून घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांचे नांव स्पष्टपणे नमुद आहे. घाटंजी पंचायत समिती अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाची दुसर्‍यांदा काढलेली ई निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करुन शासन निर्णयानुसार ई निविदा काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

⚫➡️ दरम्यान, पांढरकवडा येथील जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे उप विभागीय अभियंता अशोक धंबेचा यांच्याशी संपर्क केला असता, पंचायत समिती तालुकास्तरीय समितीचे सचिव कोन आहे या बाबत मला अजिबात कल्पना नाही. तसेच मी या समितीचा सचिव म्हणून कार्यरत नाही. तसेच असा कोणताही शासन निर्णय माझ्या वाचनात अद्यापही आलेला नाही. मी फक्त ई निविदा उघडतांना उपस्थित राहीन असे त्यांनी बोलतांना स्पष्ट केले.

🔵➡️ तथापि, घाटंजी पंचायत समितीचे प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी तथा पंचायत विस्तार अधिकारी पंजाब रणमले यांची प्रतिक्रिया घेतली असता, गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांचा पदाचा प्रभार माझे कडे आलेला नाही. त्यामुळे घाटंजी पंचायत समिती कडून काढण्यात आलेल्या “ई निविदा” बाबत सद्यातरी मला काहीही सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.