Home पुणे नणंद भावजई चा वाद झाला अन , विपरितच घडलं ,

नणंद भावजई चा वाद झाला अन , विपरितच घडलं ,

636

 

 

धक्कादायक घटना ,

अमीन शाह

घरगुती कारणामुळे बायको आणि बहिणीचा वाद झाल्याने रागाच्या भरात निघून गेलेल्या बहिणीने आत्महत्या केली . तिचा शोध घेत असतांना एका विहिरीत मृतदेह आढळला . बहिणीचा मृतदेह पाहून रागाच्या भरात भावाने त्याच्या बायकोचा कुऱ्हाडीने वार करत खून केला . यानंतर घटनेनंतर पतिनेही विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . ही धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील जुनामळा परिसरात गुरुवारी दुपारी घडली . माया सोपान सातव ( वय 35 ) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे . तर वैशाली समीर तावरे ( वय 30 ) असे हत्या केलेल्या बायकोचे नाव आहे . तर समीर भिवाजी तावरे ( वय 42 ) असे आरोपी पतीचे नाव आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मांडवगण फराटा ( ता . शिरुर ) येथील जुनामळा येथे समीर तावरे , पत्नी वैशाली तावरे आणि समीरची बहिण माया तावरे एकत्र राहत होते . माया हीच्या पतीचे निधन झाल्याने काही दिवसांपासून ती समीर सोबत राहायला होती . माया आणि वैशालीचा घरगुती कारणावरून वाद होते . मात्र , हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात माया बुधवारी ( दि 17 ) रात्री घर सोडून गेली . समीर तसेच त्याच्या कुटुंबीयांनी गुरुवारी सकाळी मायाचा शोध घेण्यास सुरुवात केली . तिने त्यांच्या शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे कळले
पत्नी विशाखा हीच्या त्रासामुळेच तीने आत्महत्या केल्याने समीरचा राग अनावर झाला . त्याने घर गाठत पत्नी विशाखाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत तिचा खून केला . यानंतर त्यानेही घरातील किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . यानंतर त्याला दौंड येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे . त्याची परिस्थीती गंभीर आहे . पोलिसांनी समीरवर खुनाचा तसेच आत्महत्येचा प्रयत्न असे दोन गुन्हे दाखल केले आहे . दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शिरुर येथे पाठवण्यात आले आहेत . शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते . गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी हस्तगत केली आहे .
समीरचे कुटुंब समाजात धार्मिक , अध्यात्मिक म्हणून ओळखले जाते . परंतु त्याची पत्नी व बहीण माया यांच्यातील भांडण विकोपाला गेल्याने ही घटना घडली आहे . माया हिच्या पतीचे निधन झाल्याने ती माहेरीच राहत होती . पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे , पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सराफले , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे , सुभाष जगताप करत आहे .