Home परभणी बेशुद्ध महिला वाहकाच्या उपचारासाठी सखाराम बोबडे पडेगावकर यांची धावा धाव

बेशुद्ध महिला वाहकाच्या उपचारासाठी सखाराम बोबडे पडेगावकर यांची धावा धाव

98

गंगाखेड प्रतिनिधी

निलंबनाच्या यादीत नाव आल्याचे कळताच मानसिक तणावाखाली येऊन बेशुद्ध पडल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या त्या महिला वाहकांची परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शुक्रवारी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

गंगाखेड आगारात महिला वाहकांची संख्या 20 आहे. त्यातील एकमेव महिला वाहक लोचना गिरी यांचे नाव निलंबित कर्मचाऱ्यांच्या यादीत आल्याने त्या मानसिक तणावाखाली आल्या. यातच त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने बेशुद्धावस्थेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही माहिती कळताच परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी आपले सरकारी जयदेव मिसे यांच्यासह उपजिल्हा गाठत या वाहक महिला कर्मचारी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. डॉक्टरांशी संपर्क करून योग्य उपचार व्हावेत अशी विनंती केली. एस टी महामंडळाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही बाब कळवली. आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांना सदर माहिती कळवली.