
पुणे – एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, बावधन, पुणे यांना अत्यंत आनंद व अभिमानाने कळवायचे आहे की इयत्ता ६वीचा विद्यार्थी आराध्य अमित दातारकर याने इंटरनॅशनल अरिथमेटिक ऑलिम्पियाड २०२५ मध्ये “चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स” या अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आणि शाळेचे नाव उज्वल केले आहे. ही स्पर्धा आर्मेनिया येथे पार पडली.
या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये रशिया, भारत, अमेरिका, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, जॉर्जिया आणि आर्मेनिया या देशांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रमुख देशामध्ये:
रशिया: रोस्तोव्ह-ऑन-डॉन, सोलनेचनोगोर्स्क, मॉस्को, तुला, सेंट पीटर्सबर्ग, क्रास्नोदर, ग्रोझ्नी, व्लादिमीर, भारत: अनेक प्रमुख मेट्रो व शैक्षणिक केंद्र, यूएसए, फ्रान्स, जर्मनी यामधील आघाडीची शैक्षणिक शहरे
आराध्यने आपल्या गणितातील असामान्य कौशल्य, अचूकता आणि विश्लेषणात्मक विचारशक्ती यावर भर देत, शेकडो आंतरराष्ट्रीय स्पर्धकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळवला.
या यशामागे त्याची मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यासवृत्ती आणि किड्स ब्रेन अकॅडमीच्या संस्थापिका व मेंटॉर सौ. पल्लवी भोसले यांचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले. तसेच एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल मध्ये मिळालेल्या सकारात्मक व सृजनशील वातावरणामुळे त्याच्या यशाला बळ मिळाले.
या आनंददायी प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नीना भल्ला यांनी सांगितले:
> “आराध्यचे हे आंतरराष्ट्रीय यश एक प्रेरणादायी उदाहरण आहे की, एकाग्रता व सर्वांगीण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपली छाप सोडता येते. आम्हाला त्याचा फार अभिमान आहे.”
उपमुख्याध्यापिका श्रीमती स्मिता शाजापूरकर म्हणाल्या:
> “आराध्य अमित दातारकर याने केवळ शाळेचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव उज्वल केले आहे. तो इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरेल.”











































