Home पुणे डॉ. सुभाष दादा सोळंके यांची कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन या संस्थेवर राष्ट्रीय...

डॉ. सुभाष दादा सोळंके यांची कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन या संस्थेवर राष्ट्रीय संचालक व राष्ट्रीय सल्लागार या पदी निवड

538

कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन ह्या संस्थेचे कार्यक्षेत्र भारतभर असून नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेचे हडपसर, पुणे येथील विभागीय कार्यालयामध्ये नुकतेच झालेल्या कार्यक्रमामध्ये पोलीस मित्र फाउंडेशन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील सिंह पुराण सिंह परदेशी यांचे मान्यतेने व राष्ट्रीय सचिव श्री राजेंद्र वसंत आहेर, प्राध्यापक डॉ. सौ. श्वेता सचिन चौगुले, राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ. श्रद्धा सुरेश दुसाने, राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष सौ आरती अशोक अहिरे संचालक व श्री पी .टी .काळे . राष्ट्रीय कोर कमिटी मेंबर ह्या सर्व पदाधिकारी यांचे शिफारशीनुसार डॉ. सुभाष दादा सोळंके यांची राष्ट्रीय संचालक व राष्ट्रीय सल्लागार या पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. .. नमूद समारंभावेळी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख मान्यवर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील सिंह पुरण सिंह परदेशी, सौ आरती अशोक अहिरे संचालक ,सौ प्रीती मैत्री पुणे शहर अध्यक्ष, सौ पद्मा शेळके पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, सौ स्मिता राहुल सोळंके, सौ नीतू सिंह, सौ प्रतिभा पाटील, सौ रूपाली तुंबारे नाशिक, सौ सुनीता धनतोडे, सीमा पंडित, मीना जगदाळे, स्वाती सुनील अफाडे, तसेच सुनील शिंदे पुणे जिल्हा अध्यक्ष, श्री अशोक पुरोहित पुरोहित कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, विवेक प्रमोद वाणी, रंजीत माने पिंपरी चिंचवड अध्यक्ष, चंद्रकांत महाले, डॉ.सुरेश तळवेकर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, श्री अमर घुले नगरसेवक, श्री पंकज कोंडे शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष व इतर मान्यवरांचे उपस्थितीत डॉ. सुभाष दादा सोळंके यांना नियुक्तीपत्र , सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुनील सिंह पुरण सिंह परदेशी यांनी केले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ प्रीती मेहत्रे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री पी .टी. काळे यांनी केले. . डॉ. सुभाष दादा सोळंके यांची कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन या या संस्थेमध्ये राष्ट्रीय संचालक व राष्ट्रीय सल्लागार ह्या पदी निवड झाल्यामुळे त्यांची सर्व सामाजिक स्तरावर अभिनंदन होत आहे.