Home यवतमाळ शेलोडी येथील जलजिवन मिशन योजनेचा लाभ फक्त ठेकेदाराला गावकरी पिण्याच्या पाण्यापासून ही...

शेलोडी येथील जलजिवन मिशन योजनेचा लाभ फक्त ठेकेदाराला गावकरी पिण्याच्या पाण्यापासून ही वंचित…!

334

अशोक जोगदंड
दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी तब्बल ५३ लाख ५१ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देऊन जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करण्याच्या कामाला २०२२ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. मात्र, सदर योजनेचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने शेलोडीच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. परिणामी, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.

पालकमंत्री यांच्या मतदार संघातच अधिकारी योजना राबविण्यात असमर्थ……

याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन येथील रखडलेली पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास न्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आहे. तालुक्यातील शेलोडी येथे नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, त्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्या यासाठी तब्बल ५३ लाख ५१ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देत दोन वर्षांपूर्वी जल जीवन मिशनच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. कंत्राटदार मार्फत सदर काम करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, पाण्याच्या टाकीचे काम सुरु झाल्यानंतर कोणत्या कारणाने काम बंद पडले हे नागरिकांना व अधिकाऱ्यांना समजले नाही

दोन वर्षापासून काम अर्धवट नागरिकांची पाण्यासाठी भटकंती कायम

परिणामी, दोन वर्षांपासून शेलोडी येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात येणारा पाणीपुरवठ्याचे काम व पाण्याची टाकी अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शुद्ध पाणी देण्याचा केलेला वादा हा हवेत जिरल्याने नागरिकां मध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

ठेकेदाराच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांची कागदी घोडे नाचण्याची मोठी कसरत

तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले शेलोडीत
तब्बल ५३ लाखावर निधी खर्च करूण या कामाकडे अधिकारी पदाधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने सदर योजना ही रखडलेलीच आहे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही

जल जीवन मिशन योजनेचे उद्दिष्ट २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाचे पाणी उपलब्ध करून देणे होते मात्र सरकार आणि अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे शेलोडी सारख्या अनेक गावांमध्ये जल जीवन मिशन योजनेचे तीन तेरा वाजलेले दिसतात ग्रामस्थांना पाण्या अभावी त्रास सहन करावा लागत आहे.२०२२ पासून जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर काम पूर्णत्वास गेले नाही,
असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अधिकारी कंत्राटदार यांच्या नाकारतेपणामुळे जल जीवन मिशन योजना कागदावरच राबवल्याचे चित्र दिसत आहे