Home यवतमाळ सहकार सेना जिल्हा कार्याध्यक्षपदी जितेश नावडे यांची नियुक्ती

सहकार सेना जिल्हा कार्याध्यक्षपदी जितेश नावडे यांची नियुक्ती

290

यवतमाळ – येथील सामाजिक कार्यकर्ते जितेश नावडे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सहकार सेना जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्याा क्षेत्रामध्ये शिवसेना संघटना शक्तीशाली व मजबुत करण्यासाठी अविरत काम कराल अशी अपेक्षा ठेऊन वरीष्ठाकडून नियुक्ती देण्यात आली आहे. ही असलेली अपेक्षा ताकदीनिशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करील अशी आशा जितेश नावडे यांनी व्यक्त केली. जितेश नावडे हे सहकार क्षेत्रातील एक अनुभवी नेतृत्व म्हणून सर्व दूरपरिचित आहेत. ते या पदाद्वारे सहकार क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडून आणतील याचा ठाम विश्वास आहे. नावडे यांनी माऊली अर्बनच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वगुणाची ओळख जिल्ह्याला करून दिली. त्यांच्या निवडीचे श्रेय त्यांनी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, खासदार संजय देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांना दिले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.