Home जळगाव श्रीराम फाऊंडेशनच्यावतीने पुरस्कारार्थीचा सन्मान सोहळा

श्रीराम फाऊंडेशनच्यावतीने पुरस्कारार्थीचा सन्मान सोहळा

108

रावेर( शेख शरीफ)

रावेर येथील श्रीराम फाउंडेशनच्या वतीने तालुकाभरात मान्यवरांना विविध क्षेत्रांमध्ये पुरस्कार मान्यवरांचा येथील मिळालेल्या मायक्रोविजन अकॅडमिक स्कूल येथे श्रीराम पाटील यांच्यावतीने सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता . कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष जे.के. पाटील होते . प्रांताधिकारी कैलास कडलक , तहसीलदार उषाराणी देवगुणे , गटविकास अधिकारी दिपाली कोतवार , नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण , रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे , गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांच्या हस्ते एकूण ५८ पुरस्कारार्थी यांना सन्मानपत्र , शाल , पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . यावेळी व्यासपीठावर श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील , दर्जी फाऊंडेशनचे श्रीयुत दर्जी सर , पी . आर . पाटील सर अधिव्याख्याता शैलेश पाटील , शैलेश राणे , पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे , योगेश पाटील उपस्थित होते . यावेळी सामाजिक शैक्षणिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारार्थीना पुरस्कार प्रदान करण्यात आले . यावेळी राजू दयाराम पाटील , घनश्याम पाटील , ललिता पाटील , बंडू पाटील , प्रशांत पाटील , दिपक नगरे , योगेश पाटील , राजेंद्र पाटील , मायक्रो विजन अॅकेडमी स्कूलचे प्राचार्य श्री . दुबे , श्रीराम फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .