Home मुंबई काम मिळत नसल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या

काम मिळत नसल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या

211
0

अमीन शाह

मुंबई , दि. २५ :- टिव्ही मालिकेत काम करणाऱ्या सेजल शर्मा या अभिनेत्रीने आज (शुक्रवार) राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. ही घटना मिरा रोड येथील राहत्या घरात घडली असून सेजल शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तिने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठित म्हटले आहे. सेजल हिने स्टार प्लसवरील ‘दिल तो हैप्पी है’ या मालिकेत भूमिका केली होती.

सेजल शर्मा ही राजस्थान मधील उदयपूर मधील राहणारी आहे. ती 2017 मध्ये मुंबईत आली होती. मिरा रोड पुर्वच्या शिवार गार्डन परिसरात असणाऱ्या रॉयल नेस्ट या इमारतीत मैत्रीणीसोबत रहात होती. शुक्रवारी सकाळी तिने घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहली आहे. त्यामध्ये तिने मी दीड महिन्यापासून नैराश्यात असल्याने आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कुणाला जबाबदार ठरवू नये, असे लिहले असल्याचे मिरा रोड पोलिसांनी सांगितले आहे.
दिल तो हैपी है या मालिकेत सेजलने सिम्मी खोसला ही प्रमुख भूमिका साकारली होती. काही महिन्यापूर्वी ही मालिका बंद झाली आहे. तेव्हापासून सेजल कामाच्या शोधात होती. मात्र, काम मिळत नसल्याने ती नैराश्यात होती, असे मीरा रोड पोलिसांनी सांगितले. तिच्या आत्महत्येमागे आणखी काही खासगी कारण आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.