Home विदर्भ हेटीकुंडी येथे खुला गटातील कबड्डी स्पर्धा  संपन्न.!

हेटीकुंडी येथे खुला गटातील कबड्डी स्पर्धा  संपन्न.!

36
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

पहिला बहुमानाचे मानकरी मराठा लांसर खामला नागपूर

वर्धा , दि. २४ :- जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथथे जय शक्ति कला व क्रीडा मंडळ यांच्या द्वारे भव्य खुला गटातील कबड्डीच्या स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्ध्येचे उदघाटन आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अमर काळे यांच्या होते संपन्न झाले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष छोटुभाऊ कामडी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून टिकाराम घागरे,गोपालराव कलोकार,साहेबराव पांडे,सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ रेवतकर, ग्रा पं हेटीकुंडी उपसरपंच दीपक डोंगरे ,गावाचे पोलीस पाटील रोशन बन्सोड, ग्रा प सदस्य सौ मंगलाबाई भक्ते, सौ शिलाबाई उकंडे, सौ प्रेमीला खडसे,सौ पुनमताई मरसकोल्हे, श्री प्रवीण भक्ते, जेष्ठ कबड्डी खेळाडू केशवराव भक्ते, पं स सदस्य चंद्रशेखर आत्राम, ,श्रीराम रमधम,राजुभाऊ लाडके भगवानजी बुवाडे हे उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे,यशस्वी उधोजक ज्ञानेश्वर रोंगे,वैद्यकीय अधिकारी कन्नमवार ग्राम मदनजी चापे, कबड्डी खेळाडू शरद बोके,राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू सुनील बारंगे, कु अनुप्रभा बन्सोड व ऋषली गाजम यांचा सत्कार उद्घाटन प्रसंगी करण्यात आला.सदर कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रातील 32 संघांनी सहभाग घेत पहिला बहुमान हा मराठा लांसर खामला नागपूर यांनी घेत ते पंचवीस हजार व स्ट्रॅफि बक्षिसाचे मानकरी ठरले,द्वितीय पारितोषिक रोख पंधराहजार व स्ट्रॅफि हे जय शक्ती कला व क्रीडा मंडळ हेटी कुंडी यांनी प्राप्त केले,तृतीय पारितोषिक रोख अकराहजार व स्ट्रॅफि हे न्यू स्टार मंडळ गादा यांनी प्राप्त केले व चोवथ पारितोषिक रोख सात हजार व स्ट्रॅफि हे आदिवासी क्रीडा मंडळ महादापुर यांनी प्राप्त केले .

तालुक्यातील बहुसंख्य कबड्डी प्रेमी रसिक प्रेमचंद भक्ते स्टेडियम वर या सामान्यांकरिता उपस्थित झाले यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ सोमकुवर यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते विजय बन्सोड यांनी मानले यावेळी स्पर्धेच्या यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Unlimited Reseller Hosting