Home मुंबई बांधकाम कामगारांचे मरण झाले स्वस्त विकासकाला दिंडॊशी पोलिसांची मदत

बांधकाम कामगारांचे मरण झाले स्वस्त विकासकाला दिंडॊशी पोलिसांची मदत

597

मुंबई प्रतिनिधी – रवि गवळी

मुंबई , दि. २४ :- मालाड पूर्व येथील एम.व्ही.क्यू डेवलपर्स मलकानी इस्टेट मध्ये इलेक्ट्रशियन लेबर म्हणून राजु राजकुमार बेन्वशी काम करताना सतराव्या मजल्याच्या इमारतीवरून पडुन जागीच मरण पावला काम चालू असताना सुरक्षेची दक्षता कामगारांना सेफ़्टी साहित्यची जबाबदारी विकासाची असते .पण विकासक यांनी इमारतीत सेफ्टी साधन जाळी न असल्याने राजु राजकुमार बेवन्शी ला आपला जीव गमवावा लागला विकासका कडून राजु बेवन्शीच्या कुटुंबाला आर्थिक मददत मिळावी ही आश्या आहे पण विकासकाला स्थानिक पोलिस स्टेशनच्या आश्रय असल्याने विकासक कोणतीच दखल घेतली नाही.

साधी नोंदही घेतली नाही… विकासक यांनी हात वर केले… घरातील कमावता पुरुष गेल्यामुळे आम्ही जगायचे कसे? एम.व्ही.क्यू डेवलपर्स मलकानी इस्टेट मध्ये इलेक्ट्रशियन लेबर म्हणून राजु बेन्वशी काम करीत असताना यांचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. पोलिसांना माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिस उप-निरीक्षक देवर्षी यांनी ठाणे दैनंदिनी मध्ये इसमाच्या अपमृत्युची नोंद क०४/२० कलम १७४ सीआरपीसी अन्वये घेवन फिर्यादी घेऊन तपास करून सुपरवायझर व्हिक्टर पाटर कसलान व ठेकेदार दुर्गाणा यांचावर गुन्हा क्रं ५०/२० कलम ३०४(A)३४ गुन्हानोंद करण्यात आला आहे विकासकाकडे मात्र कानाडोळा करून क्लीनचिट देण्यात आली आहे. राजु बेवन्शी आपला कुटुंबाचा उधारनिर्वाह करायचा तो मरण पावल्याने कुटुंबीयांवर उपासमारी व डेव्हलपर्स कडून कुठल्याही प्रकारे आर्थिक मदत नसल्याने आम्ही जगायचे कसे, असा सवाल बांधकाम कामगारांचे कुटुंबीय उपस्थित करीत असून कामगारांचे मरण स्वस्त झाले असल्याचे चित्र आहे.
इमारतीवर काम करणार्‍या बांधकाम कामगारांना योग्य सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व सुविधा त्यांना पुरविणे गरजेचे आहे. कामगारांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गमबूट, हॅण्डग्लोज आदीसह विविध सुरक्षासाधने पुरविणे गरजेचे आहे. बिल्डर, ठेकेदार यांनी हे सुरक्षासाधने देणे गरजेचे आहे. मात्र अनेक बिल्डर सुरक्षासाधने देण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ते कामगारांच्या जिवावर बेतत आहे.कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर 48 तासांच्या आत कामगार उपायुक्त कार्यालयाकडे नोंद ठेवणे गरजेचे आहे.
मात्र याबाबत नोंद ठेवण्यात आली नाही. अद्याप कोणतीच नुकसानभरपाईदेखील दिली नाही. त्यामुळे राजु राजकुमार बेवन्शी कुटुंबाला आर्थिक संकटाशी सामना.करावा लागत आहे या सर्व घटनांची तक्रार व न्याय साठी राजु बेवन्शी कुटुंबं राज्यचे राज्यमंत्री बचू कडुसाहेब यांचाकडे फ्रीयाद करणार असल्याचे पोलिसवाला प्रतिनिधीस सांगितले.