Home महत्वाची बातमी चिखली येथे 88 किलो गांज्या सह पाच आरोपीना अटक

चिखली येथे 88 किलो गांज्या सह पाच आरोपीना अटक

942

चिखली येथे झाली मोठी कारवाई : वृत्तसंकलनास गेलेल्या पत्रकारांना दमदाटी व धक्काबुक्की करून मोबाईल फोन हिसकावून फोटो केले डिलीट….

पत्रकार गाडेकर प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार
▪️ अप्पर पोलीस अधीक्षक रमेश बरकते यांचे तालुका पत्रकार संघाला आश्वासन…

प्रा.तनजीम हुसैन

चिखली:- जालना कडून चिखली मार्गे खामगावकडे जाणाऱ्या एका ट्रक मधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ सप्टेंबर रोजी तब्बल 88 किलो गांजा जप्त करून गांजाची तस्करी करणारी टोळी देखील जेरबंद केली व 5 आरोपींना अटक केली. ही कार्यवाही बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ सप्टेंबर रोजी स्थानिक खामगाव चौफुलीवर सापळा रचून खामगावकडे जाणाºया एका ट्रक मधून सुमारे १० लाख ४५ हजार ४४० रूपयांचा ८७.१७२ किलो गांजा, ट्रक व एक मोबाईल असा एकूण २० लाख ५१ हजार १३० रूपयांचा मुद्देमाल आणि गांजाची तस्करी करणारे राजू रामराव पवार वय २० वर्ष, सपना राजू पवार वय १९ वर्ष दोघे रा.शिवना ता.सिल्लोड, सुषमा रोहीदास मोहिते वय ४०, यमुना आप्पा चव्हाण वय ३० वर्ष दोघे रा.कॉटन मार्केट जवळ मोताळा, सुरेश बाबुलाल वय ४२ वर्ष रा.भवानी मंडी, झलवार राजस्थान व एक विधी संघर्ष बालक यांना अटक केली आहे.
14 सप्टेंबर च्या सकाळी साडेअकराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा व स्थानिक पोलिसांनी चिखली खामगाव रोडवरील हॉटेल अमृततुल्य जवळ एका ट्रकमधून प्रवासी वाहतूक करीत असलेल्या लोकांकडून गांजा पकडण्याची माहिती मिळताच पत्रकार समाधान गाडेकर हे वृत्तसंकलनासाठी गेले असता तिथे उपस्थित स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय निलेश शेळके, पोलीस कॉन्स्टेबल दिपक वायाळ यांनी फोटो काढण्यास मज्जाव केला आणि मोबाईल घेऊन काढलेले फोटो डिलीट केले. तसेच त्यांना धक्काबुक्की करून लोटपोट केली. याप्रकरणी आज दि 15 सष्टेंबर रोजी उप विभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी चिखली तालुका पत्रकार संघातील सदस्यांशी चर्चा केली. यावेळी पत्रकार समाधान गाडेकर यांचेसोबत झालेला प्रकार समर्थनिय नसल्याचे सांगून सदर चर्चेचा अहवाल आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन त्यांनी चिखली तालुका पत्रकार संघाला दिले. यावेळी पत्रकास संघाने आपल्या मागण्यांविषयी श्री बरकते यांना अवगत करुन दिले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधीर चेके पाटील , तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उध्दवं थुट्टे पाटील , सचिव अमोल जोशी , उपाध्यक्ष पवन शिराळे, कोषाध्यक्ष प्रफुल्ल् देशमुख व कार्याल्य चिटणीस संजय सुराणा यांचेसह जेष्ठं पत्रकार अनुप महाजन, प्रकाश मेहेत्रे, माजी अध्यक्ष , मंगेश पळसळर , गोपाल तुपकर, समाधान गाडेकर, युसुफ शेख , पवन लढ्ढा, विनोद खरे, संजय भालेराव, ओमप्रकाश खत्री, बळीराम गुंजाळ, काशीनाथ शेळके, शिवदास जाधव , आकाश डोणगांवकर, प्रा.तनजीम हुसेन , समीर शेख आदी सदस्यं उपस्थित होते.