Home महत्वाची बातमी ➡ पञकाराच्या हातात काय…??

➡ पञकाराच्या हातात काय…??

1009

इथं कागद , काच , पत्रा, उचलणारे बांधकाम गवंडी , बलुतेदारी यांची शासकीय दप्तरी नोंद होते त्यांच्यासाठी महामंडळे , कामगार उपायुक्त यांचेकडे आरोग्य कार्ड , विमा , पाल्याना स्कॉलरशिप मिळते मात्र बातमीसाठी उन्ह , वारा , पावसात राबणारा खड्यासारखा बाजूला फेकलाय त्याची जिल्हा माहिती कार्यालयात नोंद सोडा त्याला पत्रकार म्हणून कुठलीही साधी मूलभूत सुविधा ही नाही . केवळ बोटावर मोजता येतील अशी धूर्त व बडी मंडळी काही नावाला या क्षेत्रात घुसलेली काही मंडळी अधिस्वीकृती मिळवून लाभ लाटतात मात्र कार्यक्षेत्रावर बातमीसाठी आयुष्याची माती करून घेणारा समाजकंटक , माफियांच्या हल्ल्यात मारहाणीत दमदाटीत बातमीसाठी जीव दावणीला लावणारा केवळ नावाला उरलेला ग्रामीण व शहरी पत्रकार यांच्या आयुष्यात मात्र प्रचंड उपेक्षा आहेत. दुर्दैव हे की पत्रकार संघटना केवळ पदाधिकारी पोसतात, खरं तर मूळ मुद्द्यावर पाठपुरावा आंदोलने आपण करतोच कुठं?

केवळ लुटुपुटू धरणे, निवेदन इतके सोपस्कार करण्यात पत्रकार संघटना व त्यातील पुढारी तरबेज मात्र हाती काय येते? याचा विचार गांभीर्याने करणारी पत्रकारांची जमात कमी झालीय केवळ अवमान अपमान असुरक्षितात भोगायची उपेक्षेबाबत मात्र गप्प राहायचे , केवळ आजचा विचार करायचा व आपल्या कष्टावर दुसर्यांना पोसायचे? हाच उद्योग सुरू आहे. आपल्या वर्तमान भविष्याची चिंता वाहणारी पत्रकार मंडळी शोधून मिळत नाही हो…, केवळ पदे मिरवायचे पुरस्कार घेऊन स्वतःची पाठ थापटायची , राजकारणी अधिकार्यांची मैत्री वाढवायची हा उद्योग बघून केवळ आयुष्याची माती करण्याचा प्रकर सुरू आहे. भविष्यात आपल्या पदरी काही पडणार नाही तर केवळ अधिस्वीकृती ही कधीच सामान्य पत्रकारांच्या हाती लागणार नाही अशी स्थिती आहे . तुमचे आयुष्य बातमीगिरीत गेले असे किती ही सांगा तुम्हाला जिल्हा माहिती कार्यालयातून केवळ तुमच्या संपादक माध्यमांकडून प्रमाणपत्रे कागदपत्रे पुरावे मागितली जातात ती सामान्य पत्रकारांना मिळत नाही हे वास्तव….??
साधे पत्रकार म्हणून ही आपल्याला मान्यता मिळत नाही हे चिंतायला ही आता कोन्हाला वेळ नाही हेच दृश्य सर्वत्र आहे

राम खुर्दळ
( राज्य उपाध्यक्ष )
पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र राज्य