Home विदर्भ यवतमाळ जिल्हात 24 तासात 699 जण पॉझेटिव्हसह 882 बरे तर15 मृत्यु

यवतमाळ जिल्हात 24 तासात 699 जण पॉझेटिव्हसह 882 बरे तर15 मृत्यु

523

दिलासादायक : आठवडाभरात 7341 रुग्ण कोरोनामुक्त

48238 जणांचे अहवाल निगेटिव्ह

       यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्या वर आहे. विशेष म्हणजे 10 मे पासून 16 मे पर्यंत संपूर्ण आठवड्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या प्रत्येक दिवशी जास्तच राहिली आहे. संपूर्ण आठवड्यात तब्बल 7341 जणांनी कोरोनावर मात केली असून 48238 जणांचे रिपोर्ट निगटिव्ह आले आहेत.

            यात सोमवार दि. 10 मे रोजी 1010 जण कोरोनामुक्त आणि 5774 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 11 मे रोजी 1127 बरे व 6160 जण निगेटिव्ह, 12 मे रोजी 1231 जण बरे व 7369 अहवाल निगेटिव्ह, 13 मे रोजी 1013 जण बरे व 7985 अहवाल निगेटिव्ह, 14 मे रोजी 1085 जण बरे 7793 अहवाल निगेटिव्ह, 15 मे रोजी 993 जण बरे व 5887 अहवाल निगेटिव्ह आणि रविवार दि. 16 मे रोजी 882 जण कोरोनामुक्त तर 7270 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

गत 24 तासात जिल्ह्यात जिल्ह्यात 699 जण पॉझेटिव्ह तर 882 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा मृत्यु झाला. यात दोन मृत्यु जिल्ह्याबाहेरील (नांदेड आणि नागपूर) आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 9 मृत्यु, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एक तर खाजगी रुग्णालयातील पाच मृत्यु आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 7969 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 699 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7270 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4705 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2277 तर गृह विलगीकरणात 2428 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 67703 झाली आहे. 24 तासात 882 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 61378 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1620 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.73 , मृत्युदर 2.39 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 50 वर्षीय पुरुषा व 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 25 वर्षीय पुरुष व 53 वर्षीय महिला, वणी येथील 45 वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील 35 वर्षीय महिला, दिग्रस येथील 65 वर्षीय महिला, नेर तालुक्यातील 65 वर्षीय महिला आणि नांदेड येथील 75 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये मृत्यु झालेल्यामध्ये राळेगाव तालुक्यातील 81 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुष, कळंब येथील 65 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 64 वर्षीय, वणी येथील 65 वर्षीय पुरुष आणि नागपूर येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.

            रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 699 जणांमध्ये 418 पुरुष आणि 281 महिला आहेत. यात पांढरकवडा येथील 55 पॉझेटिव्ह रुग्ण, बाभुळगाव 18, यवतमाळ 60, आर्णि 42, दारव्हा 43, घाटंजी 28, पुसद 25, राळेगाव 20, झरीजामणी 73, कळंब 3, वणी 177, दिग्रस 38, महागाव 9, उमरखेड 24, नेर 36, मारेगाव 39  आणि इतर शहरातील 9 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 532041 नमुने पाठविले असून यापैकी 529179 प्राप्त तर 2862 अप्राप्त आहेत. तसेच 461476 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

           

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1106 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 32 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 1106 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 355 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 222 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 166 रुग्णांसाठी उपयोगात, 360 बेड शिल्लक आणि 32 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 617 उपयोगात तर 524 बेड शिल्लक आहेत.