Home विदर्भ तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून आता तर चक्क दिवसा...

तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून आता तर चक्क दिवसा ढवड्या ही रेती शहरात आणली जात आहे.

224
0

आर्वी तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक, महसूल विभागाचे दुर्लक्ष

ईकबाल शेख – 9834453404

वर्धा जिल्हा आर्वी तालुका : आर्वी तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून चक्क हि रेती दिवसा ढवड्या शहरात आणली जात आहे.
सर्वत्र लाँकडाऊन आहे प्रशासनाची करडी नजर असतांना देखिल रेती तस्करी कशी काय चालते हा प्रश्न जनसामान्याना पडत असुन कुठे यांचे साटेलोटे तर नाहि ना अशि चर्चा एकायला मिळत आहे त्यामुळे प्रशासनाची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसुन येत आहे.

प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे रेती माफियांच्या या उद्योगात प्रशासनही सामिल आहे काय, असा संशय व्यक्त होत आहे. शहरासह ग्रामीण भागात बांधकामामध्ये वाढ झाल्याने रेतीची मागणी वाढली आहे. रेतीच्या व्यवसायात तेजी असल्याने ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर यासारखी वाहने रेती घाटावरून येथे रेती आणत आहे. दर दिवशी एक ट्रीप मारली जाऊ शकते, मात्र अधिक नफा कमाविण्यासाठी विना रॉयल्टी रेती शहरात आणली जात आहे. या रेती तस्करीला पोलीस, महसूल प्रशासन व परिवहन विभागाकडून मूक संमती असल्याचे दिसून येते.

अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमानावर चालत असुन सुद्धा याकडे लक्ष का दिले जात नाहि की जानिव पुर्वक दुर्लक्ष केले जाते प्रशासनातील अधिकारी आपल्या अंगावर बितेल या पोटि दुर्लक्ष करतात की ईतर काहि मात्र दरवर्षि लाखोचा महसुल बुडत असतांना देखिल असे का होत आहे असा प्रशन निर्माण होत आहे