Home जळगाव कुंभारखेडा उटखेडा रस्त्यावरील नाल्यांवर छोटा पुल उभारावा…

कुंभारखेडा उटखेडा रस्त्यावरील नाल्यांवर छोटा पुल उभारावा…

85
0

रावेर (शरीफ शेख)

फैजपूर,कळमोदा,खिरोदा, सावखेडा, कुंभारखेडा, गौरखेडा, लोहारा,उटखेडा,ते विवरा, भाटखेडा, शिंदखेडा, कुसुंबा, मुजंलवाडी रावेर या गावा जोडाणारा प्रमुख रहदारीचा रस्ता हा कुंभारखेडा फाटा, सुकी नदीच्या पुलावरून ते उटखेडयात जातो, हा रस्ता साधारण 5.5 मीटर अरुंद आहे,तरी सुकी नदीच्या पुलावरून थोड्याच अंतरावर विठ्ठल राणे, भारंबे यांच्या शेताजवळी नाल्यांवर हा रस्ता अधिकचं निमुडता झालेला आहे, त्यात 4. मीटरच्या आत चं नाल्यांचे धोकादायक वळणावर सुमारे रस्त्यावर म्हणजे 1.5 मीटरच्या आत मोठा खड्डा पडला आहे, कारण हा नाला ओपन असून भररस्त्यात बराचसा भाग येतोय, बरेच दिवसांपासून ह्यांच्या कळा दररोजच्या अवजड वाहने, मालाच्या गाड्या, ट्रॅक्टर, यांच्या मुळे घसरतो आहे, याठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी लोहारा येथील आदिवासी बांधवांचा रात्री वेळी जबर अपघात रिक्षाला झाला आणि यांत त्या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत, यामुळे अजून ही जर एकाच वेळी दोन मोठी,वा एक चारचाकी वाहन व दुसर मोटरसायकल जर आली तर सुध्दा अवधांनाने, किंवा चालकांचे नियंत्रण ठेवणे अवघड झाल्यास नक्कीच येथे अपघाताची दाट शक्यता निर्माण होते, आणि यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये सतत अपघाताची भीती डोक्यात भूत याठिकाणी दळणवळणाच्या वेळी असते, म्हणून आताचं सुकी नदीच्या पुलाची दुरुस्ती चालू आहे, त्यात पुढे संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू झालेलं आहे, यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा शाखा अभियंता श्री बावस्कर यांना कार्याध्यक्ष विलास ताठे रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी सदर बाबींची गंभीरपणे दखल घेऊन तेथे छोटासा पुलं उभारणी करण्यासाठी गड घातली आहे, तसेच श्री बावस्कर यांनी त्यांच्या विनंती वरून या संदर्भात वरीष्ठ अधिकारी यांच्या पर्यंत ही बाब पोहोचवून काही करता येईल तर नक्कीच करू असा आशावाद प्रत्यक्ष पाहणी दरम्यान व्यक्त केला.