Home विदर्भ आष्टी शहिद येथील विद्यार्थ्यानी टाकाऊ वस्तूपासून बनविले पक्ष्यांचे घरटे

आष्टी शहिद येथील विद्यार्थ्यानी टाकाऊ वस्तूपासून बनविले पक्ष्यांचे घरटे

276
0

रवींद्र साखरे – आष्टी

 

वर्धा / आष्टी (श.) :उन्हाळा आला कि पाण्याची कमतरता यामुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत चालले आहेत. एप्रिल महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही मिळत नाही. अशावेळी पक्षीमित्रांकडून परिसरात पाणवठे तयार केले जातात. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली जाते. पण ती सर्वांसाठी पुरेशी ठरणारी नाही.

त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून पक्षांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्याचा विचार पुढे आला आणि त्या संदर्भातुन जागतिक पक्षी दिनाचे औचित्य साधून आष्टी येथील खडकपुरा प्रभागात राहणाऱ्या १० व १२ वीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरातील खाद्य तेलाचे निकामी पिपे तसेच पानांचे निकामी पेटारे यापासून पक्ष्यांसाठी आकर्षक व सुंदर घरटे बनविले. ते घरटे शहरातील प्रत्येक झाडावर बांधून पक्षांसाठी चारा पाणी टाकून बांधण्यात आले .हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता धनराज हिरुडकर, प्रवीण मजेठिया,राहुल वरघणे, गोपाळ घाटोळे, पंकज बालपांडे ,राहुल खोडे, अविनाश मोकदम, नरेंद्र मोकदम, मंगेश मोकदम, धीरज हिरुडकर ,गणेश घाटोळे, मयूर बाराइ, राहुल वरघने, हर्षल चदीवाले आदींचा सहभाग होता. या उपक्रमाचे सर्व स्तरातन कौतक खप आहे.