Home विदर्भ आर्णी पं.स.अंतर्गत महाळुंगी ग्रा. पं.मध्ये एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार – अनिल नाईक

आर्णी पं.स.अंतर्गत महाळुंगी ग्रा. पं.मध्ये एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार – अनिल नाईक

1495
0

 वनजमिनीवर घरकुल , बि.डी ओ .चे दुर्लक्ष….!

चौकशीची मागणी ,  पं. स.मध्ये खळबळ…..!!


देवानंद जाधव

यवतमाळ –  जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेने नुकतेच आपले तोंड काळे करुन, ग्राहकांची फसवणूक करुन तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार ताजा असतांनाच, पंचायत समिती अंतर्गत महाळुंगी ग्राम पंचायत मध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार ऊघडकीस आल्याने, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे पॅण्ट कमरेतुन सैल झाले असुन, पंचायत समिती मध्ये खळबळ माजली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून पं.स.आणि ग्रा.पं यांनी संगनमत करुन शासनाची तिजोरी लुटण्याचे पाप केले आहे. हा गंभीर प्रकार लक्षात येताच वसंतराव नाईक विकास महामंडळ मुंबई चे माजी संचालक अनिल विजयसिंग नाईक यांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून शासन आणि प्रशासनाचे कान टोचले आहे. महाळुंगी ग्राम पंचायत मध्ये शासनाच्या विविध योजने अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी आला. माञ सबंधीत अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदर निधीला आपली खाजगी मालमत्ता समजुन फस्त केला आहे. नाला सरळीकरण, शेततळी, सिमेंट बांध, नाली बांधकाम, शौचालय बांधकाम, १४वा आणि १५ वा आयोगाचा निधी ची पुरती वाट लावली आहे. रोहयो अंतर्गत अनेक कामे थातुरमातुर आणि यंञाने केली आहेत. आणि बोगस मजुरांचे बोगस जाॅब कार्ड लाऊन बिल काढण्याचे पाप केले आहे. नाला सरळीकरण करतांना पंधरा विस गगनचुंबी झाडे पाडण्यात आली आहे. ती आजही तेथेच पडुन आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निर्माण केलेले गावातील शौचालय अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. प्रती शौचालयाचे बारा हजार रुपये प्रमाणे बिल काढुन ग्राम पंचायतने शासनाला लाखो रुपयाचा चुना लावला आहे. कागदोपत्री कामे दाखऊन लाखो रुपये खिशात घातल्याचा धक्का दायक प्रकार महाळुंगी मध्ये घडला आहे. नऊ बोऊरवेल शंभर फुटापर्य॓त खोदल्या आहेत माञ मोजमाप पुस्तीकेमध्ये दिडशे ते दोनशे फुट दाखवुन बिल काढले आहे. शिवाय दोन विहीरीच्या दुरुस्तीच्या नावावर, नाममाञ काम करुन लाखो रुपये हडपले आहे. शेकडो शौचालयाचे खड्डे दोन अडीच फुट करुन अत्यंत बोगस निर्मिती केली आहे. बळीराजा चेतना अभियानाचे बोगस लाभार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यात आला आहे. लाखो रुपयांची कामे केवळ कागदोपत्री दाखऊन, काम न करताच बिले काढण्यात आली आहे. या शिवाय अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे वनविभागाच्या जमिनीवर मालकी हक्क दाखवुन चक्क घरकुल ऊभारुन विविध विकास निधी बोगस कागदपत्रे तयार करुन, खर्च करण्यात आला आहे. या सह अन्य नियमबाह्य आणि बोगस कामाच्या संदर्भात आर्णी गट विकास अधिकारी ,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे व्यथित होऊन अनिल नाईक राठोड यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमुलकर यांचे कडे नुकतीच तक्रार दाखल केली. तेव्हा कुठे चौकशीला गती आली त्यामुळे भ्रष्टाचार करणा-यांचे धाबे दणाणले आहे. सर्व तक्रारीमधील सर्व मुद्द्यांचा सारासार विचार करून. आणि सखोल चौकशी करावी, आणि तत्कालीन प्रशासक, सरपंच, ग्रामसेवक,संगणक चालक, रोजगार सेवक, या ग्राम पंचायत कर्मचा-यासह गट विकास अधिकारी आणि शाखा अभियंता यांचेवर कठोर कारवाई करावी आणि अवैधपणे बोगस कागदपत्रांच्या आधारे शासनाची तिजोरी लुटण्याचे पाप करणा-या सबंधीतांवर कारवाई करावी .आणि संपुर्ण कामाचे मुल्यांकन करुन भ्रष्टाचाराची रक्कम वसुल करावी व संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी ,अशी मागणी वसंतराव नाईक विकास महामंडळ मुंबई चे माजी संचालक अनिल विजयसिंह नाईक राठोड यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ संजय रायमुलकर यांचे कडे केली आहे. भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचारी यांना कठोर शासन न झाल्यास, ऊच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दाद मागण्याचा ईशारा अनिल नाईक यांनी दिल्याने पंचायत समिती आणि ग्राम पंचायत मध्ये खळबळ माजली आहे.