Home महत्वाची बातमी साखरखेर्डा येथे अनेक मतदार राहणार मतदाना पासून वंचित ,

साखरखेर्डा येथे अनेक मतदार राहणार मतदाना पासून वंचित ,

142

 

नवीन मतदार नोंदणी साठी लोक फिरतात दारोदारी ,

अमीन शाह ,

बुलडाणा , सिंदखेडराजा तालुक्यात सर्वात मोठा शहर वजा गाव असलेल्या साखरखेर्डा येथे लोकांना बी ऐल वो सापळत नसल्यामूळे अनेक मतदार मतदानाच्या अधिकारा पासून वंचित राहणार असल्याचे दिसत असून लोक हातात कागदपत्रे घेऊन बी ऐल वो ना शोधत आहे तर अनेक नागरिकांना मतदान याद्या अध्यावत करण्याचे काम सुरू असल्याची ही माहिती नाही येथे निवडणूक विभागाच्या वतीने मतदारात कोणतीही जनजागृती केली जात नसल्याचे दिसून येत आहे मिळालेल्या माहिती नुसार

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी ‘बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नोंदणी आणि दुरुस्ती .

मतदारयाद्यांची पुनर्निरीक्षण मोहीम नुकतीच राबविण्यात आली होती त्याअंतर्गत नव्याने मतदार यादीत समावेश करण्यापासून ते पत्त्यातील दुरुस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे याबाबतचे काम बी ऐल वो कडे देण्यात आले आहे
‘बीएलओ’मार्फत मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम करण्याची जवाबदारी देण्यात आली आहे. , एक जानेवारी 2019 20 पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाची नोंद घेणे मतदान याद्या अध्यावत करणे स्थलांतरित मतदार मृत झालेले मतदार नवीन लग्न झालेले मतदार इत्यादींची नोंद घेण्याचे काम या बूथ लेवल ऑफिसर कडे देण्यात आलेली आहे , मात्र निवडणूक विभागाने साखरखेर्डा येथे कोणते बी ऐल ओ नेमले आहेत हे लोकांना माहीत नसल्या मूळे लोक ग्राम पंचायत कार्यालय , मराठी प्राथमिक शाळा , उर्दू शाळा , तलाठी कार्यालय येथे कागदपत्रे घेऊन फिरत आहे या संदर्भात तहसीलदार सावंत यांच्याशी सम्पर्क साधला असता साखरखेर्डा येथे पाच बी ऐल वो ची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते काय करत आहे या साठी ही एक कर्मचाऱ्या कडे जवाबदारी देण्यात आलेली आहे असे त्यांनी सांगितले , साखरखेर्डा येथे लवकरच ग्राम पंचायत ची निवडणूक होणार असून या निवडणुकीत बी ऐल वो च्या हलगर्जीपणा मूळे अनेक नवीन मतदार मतदाना पासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट दिसत असून या प्रकारा कडे जिल्हाधकारी यांनी लक्ष केंद्रित करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे ,