Home विदर्भ मंगरूळ च्या सेतु मध्ये चौकशी पथकाची धाड

मंगरूळ च्या सेतु मध्ये चौकशी पथकाची धाड

259

देवानंद जाधव

यवतमाळ – तालुक्यातील मंगरूळ येथील सेतु सुविधा केंद्रातील गैरव्यवहाराची तालुका दंडाधिकारी तथा कर्तव्य दक्ष तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी गंभीर दखल घेतली आहे. गेल्या आठवड्यापासून वृत्तपञ. आणि समाज माध्यमातून सेतु मध्ये झालेल्या पापाचे पितळ ऊघडे पडले आहे.
सेतु सुरू झाला तेव्हा पासुन अगदी आज पर्यंत कोणालाही टोकन दिलेच नाही हे विशेष. शासकीय फी शिवाय दिडशे, दोनशे, ते अडीचशे रुपये कोणत्याही एका प्रमाणपञाला अतिरिक्त आकारुन,.भाडोञी सेतु चालकाने परिसरातील गोर गरीब जनतेचे खिसे खाली केले आहे. अतिरिक्त घेतलेली रक्कम आणि सेतु मधुन आजपर्यंत दिल्या गेलेले हजारो याचा गुणाकार केल्यास लुटलेली रक्कम लाखोंच्या घरात जात आहे. या मुळ मुद्दा चौकशीत घेतला आहे. नागरिकांना टोकन न देण्यामागे सेतु चालकाची हरामाची कमाई दडली आहे. कार्यालयीन दिवशी सेतु बंद ठेवणे, मनात येईल तेव्हा सेतु उघडणे ,असा मनमानी कारभार मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. विशाल प्रमाणात आजही लुट होत आहे. परिसरातील जनतेच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली गेली आहे, तहसीलदार कुणाल झाल्टे यांचे मार्गदर्शनाखाली विभागाचे नायब तहसीलदार आणी मंडळ अधिकारी यांच्या चौकशी पथकाने, काल मंगळवारी चार वाजता धाड टाकुन चौकशी केली. चौकशी मध्ये अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. गोर गरीबांचे रक्त पिणार्यांची कदापीही गय करणार नाही असे सांगितले. तहसीलदारांच्या या कणखर भूमिके मुळे मंगरूळ, तरोडा, बेलोरा, वाई, बेचखेडा, साकुर रामनगर, बोरी गोसावी, चांदापुर, भांब राजा हिवरी सह अन्य गावातील जनतेमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. चौकशी पथका समोर मागेमागे शेपटी हलवत सर ….सर…करीत गयावया करणार्या ऊर्मट सेतु चालकावर ” विशाल”प्रकाराची कारवाई व्हावी असी जनतेचे मागणी आहे. टोकन न देणे ,आणि बचत गटाच्या कर्जासाठी कमी वय, आणि निराधार केस साठी वय वाढवलेले आधार कार्ड बनवुन देणे. आता सेतु चालकाच्या अंगलट येणार आहे. तुर्तास मुळ मालकाने परगावच्या माणसाला भाड्याने दिलेल्या या सेतु चा परवाना तातडीने रद्द करावा आणि दोषीवर फौजदारी आणि कायदेशीर कारवाई करावी असी परिसरातील जनतेची मागणी आहे.