Home जळगाव राजवडच्या पाकीजा पटेल यांचा सन्मानपूर्वक गौरव

राजवडच्या पाकीजा पटेल यांचा सन्मानपूर्वक गौरव

162

रावेर (शरीफ शेख) 

धुळे जिल्हा कलाध्यापक वेल्फेअर सोसायटीतर्फे शिक्षक दिना निमित्ताने यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार पाकिजा पटेल यांना देऊन गौरविण्यात आले.
कला ,क्रीडा ,सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, मेडल, शाल, गुलाब पुष्प आहे.आयुष्यभर पुरेल अशा प्रकारचे शाश्वत विद्या सदनाचे कार्य , तसेच कला क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक ,सामाजिक विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी सह वर्तमान व भविष्यकालीन आव्हाने स्वीकारणारे निर्भय विद्यार्थी , सुजान नागरिक घडविण्याचे मौल्यवान कार्य करून देश सेवेसाठी हातभार लावत आहेत त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार बहाल झाला या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.