विदर्भ

खोटे स्वाक्षऱ्या करून निवेदन तक्रार देऊन शिक्षण विभागाची दिशाभूल करणार्यांवर तात्काळ कार्यवाही करा – ए.आई.एम.आई.एम

Advertisements
Advertisements

नूर उर्दू शाळेबाबत गळव्हा येथील नागरिकांचे खोटे निवेदन , तक्रार देणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीची गावकऱ्यांची मांगणी

यवतमाळ – नूर बहुउद्देशीय महिला शिक्षण संस्था द्वारा संचालित नूर उर्दू प्राथमिक शाळेचे गळव्हा येथून यवतमाळ स्थलांतरसंदर्भात गळव्हा येथील नागरिकांचे खोटे निवेदन तक्रार शिक्षण विभागात देऊन शाळेचे नाव समाजात खराब करण्याचे उद्देश पुढे ठेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे खोटे आरोप करून कार्यवाहीची मांगणी केली जात आहे, सदर बाबा ही गावकऱ्यांचे लक्षात आली असतां त्यांनी शाळेचे स्थलांतर संदर्भात कोणत्याही तक्रार दाखल केली नसल्याचे व त्यांचे नावे खोटे स्वाक्षऱ्या करून शाळेवर खोटे आरोप करणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीची मांगणी केली व ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मूस्लमिन (ए.आई.एम.आई.एम) ने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन खोट्या तक्रार करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मांगणी केली,

या प्रकरणात वास्तुदर्शक स्थिती अशी की गळव्हा या गावात नूर उर्दू प्राथमिक शाळा होती गावात एकूण 35 उर्दू भाषिक घरे असून या गावातील उर्दू भाषिक लोकसंख्या कमी असल्याने शाळेचे संस्थेने गावकऱ्यांचे व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या संमतीने ग्राम पंचायत गळव्हाची ना हरकत घेऊन गळव्हा वरून यवतमाळ या ठिकाणी नूर उर्दू प्राथमिक शाळा ही शाळा स्थलांतर केली,
पण शाळा स्थलांतर आदेश रद्द करण्यात यावा अशी खोटी तक्रार गावकऱ्यांचे नावाने दाखल करून या शाळेची बदनामी करण्याचे उद्देशाने दाखल करून कार्यवाहीची मांगणी देखील करण्यात आली,

गावातील उर्दू भाषिक सर्व 35 घरांच्या स्वाक्षरीचे निवेदन शिक्षण विभागात दाखल केली असून एक प्रत एम आई एम ला देऊन सदर प्रकरणात गावातील नागरिकांच्या नावाने खोटे स्वाक्षऱ्याचे आधारावर खोटी तक्रार करणाऱ्या विरोधात कार्यवाही करण्यात यावी अशी मांगणी करण्यात आली,
गळव्हा येथील गावकऱ्यांचे खोटे स्वाक्षऱ्याच्या आधारे शाळेवर खोटे आरोप करून कार्यवाहीची मांगणी करणार्याविरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मांगणी ए.आई.एम.आई.एम चे यवतमाळ शहराध्यक्ष इरफान शेख (चांद) यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेटी दरम्यान केली या वेळी ए आई एम आई एम चे वसीम खान साबीर शेख, वसीम अक्रम आदि उपस्थित होते.

गळव्हा येथील नागरिकांच्या खोटे स्वाक्षरीच्या आधारावर नूर उर्दू शाळेवर खोटे आरोप लावून तक्रार करणार्याविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट घेऊन ए.आई.एम.आई.एम तर्फे करण्यात आली या पुढे अल्पसंख्याक शाळेवर खोटे आरोप करून समाजात शाळेचे नाव खराब करण्याचे कट मजलिस खपवून घेणार नाही.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...