Home मराठवाडा प्रहार कला, कार्या. व क्रिडा शिक्षक संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी श्री राजाबंर...

प्रहार कला, कार्या. व क्रिडा शिक्षक संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी श्री राजाबंर मते व सरचिटणीस पदी श्री. बाबुसिंग राजपूत यांची निवड

130
0

जालना – प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न प्रहार कला कार्यानुभव व क्रीडा शिक्षक संघटना जालना कार्यकारिणी अध्यक्षपदी राजांबर मते व सरचिटणीस पदी बाबूसिंग राजपूत यांची निवड शालेय शिक्षण विभाग राज्यमंत्री तथा संघटनेचे सर्वेसर्वा बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.

या नियुक्तीपत्रा मध्ये म्हटले आहे की,वरील नियुक्ती संघटनेच्या धोरणात कटिबद्ध असून आपण आपल्या पदाची प्रमाणिक वाटचाल करून संघटनेचे व वंदनीय बच्चू भाऊंचे विचार तळागाळापर्यंत न्याल हा विश्वास वाटतो. आपण वेळोवेळी संघटनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे,धोरणाचे पालन कराल अशी आशा बाळगतो आपल्या नियुक्तीने शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांना न्याय मिळून देण्यासाठी आपल्या स्तरावरून वेळोवेळी प्रयत्न व्हावेत. तसेच जिल्ह्यातील कला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करून कार्यकारिणी गठित करावी. संघटनेचे ध्येय -धोरण यानुसार आपले कार्य असावे. आपणाकडून या पदाची व संघटनेची प्रतिमा मलिन होईल असे कुठलेही कार्य घडू नये याची दक्षता घ्यावी.
संघटनेचे राज्याध्यक्ष अजय तापकिर व राज्य सरचिटणीस विकास घुगे यांच्या परवानगीने हि नियुक्ती जाहिर करण्यात आली असून आपण सदैव त्यांच्या संपर्कात राहून संघटनेत सक्रीय रहावे. आपल्या कार्यकालात कला, कार्यानुभव व क्रिडा शिक्षक यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि संघटनेचा वटवृक्ष व्हावा हि सदिच्छा !
या निवडी बद्दल राजांबर मते व बाबूसिंग राजपूत यांचे राज्यअध्यक्ष अजय तापकिर, राज्य सरचिटणीस विकास घुगे,राज्य संपर्कप्रमुख संतोषजी राजगुरु , प्रहार जनशक्ती पक्षाचे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सचिनजी ढवळे , विदुरजी लगडे, प्रहार औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब भोसले व महाराष्ट्रातील तमाम निदेशक बांधवानी अभिनंदन केले आहे.