Home विदर्भ ” शंकर “चे शव शोधण्यासाठी प्रशासनाची अडाण नदी कडे धाव   – जिल्हाधिकारी...

” शंकर “चे शव शोधण्यासाठी प्रशासनाची अडाण नदी कडे धाव   – जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे निर्देश

806
0

तहसीलदार आणि ठाणेदार तळ ठोकून तर बिट जमादारांची तळमळ 

देवानंद जाधव

यवतमाळ , दि. १२ :-  ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या बेलोरा (रूई)येथे शुक्रवारी श्रीराम मारबते यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थ, आप्तेष्ट, आणि असंख्य हितचिंतकांच्या ऊपस्थीतीत अडाण नदीच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोपस्कार पार पाडल्यानंतर सर्व जण जड अंत:करणाने माघारी परतले. माञ कळत नकळत बेलोरा निवासी शंकर तुकाराम खंगार यांनी आंघोळ करण्याच्या उद्देशाने अडाण नदीत ऊडी घेतली. अन तेथेच त्यांचा घात झाला. ती ऊडी त्यांच्या जिवनाची अंतीम ऊडी ठरली. अडाण नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्याने प्रवाहा सोबत शंकर वाहुन गेले.ही खबर वार्याच्या वेगाने पंचक्रोशीत पोहोचली. कर्तव्य दक्ष जिल्हाधीकारी एम. डी सिंह यांनी या घटनेची गांभीर्याने आणि तितकीच तातडीने दखल घेतली..आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग,तहसीलदार ,आणि पोलीस प्रशासनाला मृतदेहाचे शोध घेण्याचे निर्देश दिले. यवतमाळ तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी तातडीने पावले ऊचलत शोध पथकासह बेलोरा येथे धाव घेतली. बोट आणि विविध साधनांनी परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन चमु अडाण नदीतील अथांग पाण्यात शंकरचा मृतदेह शोधत आहे. शनिवार चा सुर्य क्षितीजाकडे गेला तरी शंकरचा थांगपत्ता लागला नव्हता. पण युध्द पातळीवर शोधकार्य सुरुच आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय शिरभाते तळ ठोकून आहेत.
शिवाय हिवरी बिटचे जमादार सुरेश झोटींग यांची मृतदेहाचा शोध घेण्याची तळमळ, मानवी डोळ्यात पाणी आनणारी आहे. ऊपासी पोटाने अडाण नदीच्या तीरावर बसुन मृतदेह मिळेल ही आस लाऊन ते बसले आहेत. जिल्हाधीकारी एम.डी .सिंह. तहसीलदार कुणाल झाल्टे, ठाणेदार संजय शिरभाते,
कर्तव्य दक्ष बिट जमादार सुरेश झोटींग, पोलीस शिपाई खुशाल राठोड, तलाठी माधवी नवरखेले, पोलीस पाटील कृष्णा मेश्राम.सह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बेलोरावासीयांकडुन कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.