Home विदर्भ उमेद अभियाना च्या माध्यमातून लाखो महिलांच्या उपजीविकेचा मार्ग सुकर करणार्‍या पाच हजार...

उमेद अभियाना च्या माध्यमातून लाखो महिलांच्या उपजीविकेचा मार्ग सुकर करणार्‍या पाच हजार कर्मचार्‍यांच्या उपजीविकेवर शासनाच्या अन्यायकारक निर्णयामुळे टांगती तलवार

381
0

जिल्ह्यात रातोरात 72 कर्मचाऱ्यांना करण्यात आले पदमुक्त

 

अमरावती – महिलांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी झटणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या शासनदरबारी हालचाली सुरू झाल्या असून जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या 72 कर्मचाऱ्यांना कोणतेही कारण न देता कार्यमुक्त करण्यात आले आहे. शासनाच्या या अन्यायकारक धोरनामुळे महिलांच्या उन्नतीसाठी अहोरात्र धडपडणाऱ्या उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपजीविका धोक्यात आलेल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील 72 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 450 कर्मचाऱ्यांना शासनाने रातोरात कार्यमुक्त केले आहे. शासनाच्या या धोरणामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण निर्माण झालेला आहे. जिल्हा अभियान व्यवस्थापक अमरावती तसेच जिल्ह्यात उमेद अभियान आत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांना आज निवेदन दिले. कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असे आश्वासन बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री यांनी दिलेले आहे