Home मुंबई भिम आर्मी च्या नामफल का चे उदघाट्न संपन्न…!

भिम आर्मी च्या नामफल का चे उदघाट्न संपन्न…!

75
0

मुंबई – संपूर्ण देशात युवकांचे प्रेरणा स्थान बनत असलेले संविधान रक्षक भीम आर्मी संस्थापक भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश प्रमुख नेहाताई शिंदे, मुंबई अध्यक्ष दीपक हनवते यांच्या नेतृत्वात नुकतेच मुंबई दहिसर केतकी पाडा पूर्व मागाठाणे…. भीम आर्मीच्या बोर्डाचे उदघाटन भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास जैस्वार यांच्या हस्ते मोठ्या उत्सहात केले. या मंगल प्रसंगी भीम आर्मीचे मुंबई उपाध्यक्ष मा. संजय अहिरे, कृष्णा दांडगे, नवनियुक्त उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश वाघमारे, उपाध्यक्ष विजय बनसोडे, उत्तर प. मुंबई अध्यक्ष दीपक जगदेव, प्रवीण खरात, कैलास आखाडे, भारत आखाडे, उपाध्यक्ष प्रियांका वाघमारे, उपासक गायकवाड, राहुल सावंत, आकाश ओव्हाळ, रवी ससाणे अनिल खाडे शरद सदर आणि भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याची उपस्थिती लक्षणीय होती. 

दीपक हनवते, मुंबई अध्यक्ष यांनी आश्वासित केले कि पुढील येणाऱ्या काळात मुंबईच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये भीम आर्मी चा बोर्ड नाम फलक लावण्यात येईल व येणाऱ्या काळात भिम आर्मीचे संघटन खूप मोठे असेल असे दीपक हनवते यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.