Home विदर्भ पोलीस मित्र परिवार समन्वय समिती धामणगांव रेल्वे तालुका बैठक संपन्न

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती धामणगांव रेल्वे तालुका बैठक संपन्न

70
0

प्रशांत नाईक

अमरावती – जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे तालुका पोलीस मित्र परिवार समन्वय समितीची आढावा बैठक आज दि. 09/09/2020रोजी तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज ग्राम गिरोली येथे संपन्न झाली.
बैठकीत समितीची पुढील नियोजन व समिती मार्फत गरजू लोकांना पुरविण्यात येणाऱ्या सुख सोई बद्दल माहिती देण्यात आली.
आढावा बैठकीला प्रमुख उपस्थित समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. मा.ड्रा. सांगपालजी उमरे साहेब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष मा. नारायणकाका जाधव सामाजिक कार्यकर्ता श्री. गोपाल देशमुख, मुकुंद देशमुख, जिया भाऊ पठाण, राजुभाऊ डगवार, आष्टा येथील माजी सरपंच हिरालाल गवारले, बंटी शिंगणापुरे, तसेच समितीचे तालुका विभागीय प्रमुख श्री. बाबारावजी इंगोले तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रशांत भाऊ नाईक व असंख्य गावकरी उपस्थित होते.