Home मराठवाडा श्री सरस्वती भुवन प्रशाला, बिडकीनच्या एन.सी.सी. विभागाचा विद्यार्थी सी.एस.एम अथर्व अरूणराव उगले...

श्री सरस्वती भुवन प्रशाला, बिडकीनच्या एन.सी.सी. विभागाचा विद्यार्थी सी.एस.एम अथर्व अरूणराव उगले याची २०१९-२० या वर्षांच्या कॅडेट वेलफेअर सोसायटी शिष्यवृत्तीसाठी निवड.

155

बिडकीन – प्रतिनिधी

औरंगाबाद – श्री सरस्वती भुवन प्रशाला, बिडकीनच्या एन.सी.सी.विभागाचा विद्यार्थी सी.एस.एम अथर्व अरूणराव उगले याची २०१९-२० या वर्षांच्या कॅडेट वेलफेअर सोसायटी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
१४ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१९ या कालावधी मध्ये अथर्व हा बेळगाव (कर्नाटक ) येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रेनिंग कॅम्प मध्ये सहभागी झाला होता.
अथर्वला शिष्यवृत्ती मिळाल्या बद्दल ५० महाराष्ट्र बटालियनचे कमांडिग ऑफिसर कर्नल एम. के. सिरोही, अँडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अभिजित बर्वे, सुभेदार मेजर रमेशसिंग यांनी अभिनदंन केले. स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री.किसनसेठ तोतला व मुख्याध्यापक श्री.मधुकरराव बिरहारे यांच्या हस्ते अथर्व उगलेचा सत्कार करण्यात आला. नियामक मंडळाचे सदस्य श्री. नंदकुमार वैद्य, डॉ. मिलिंद कोनार्डे,डॉ.अंताराम धरपळे, श्री.मच्छिन्द्र हाडे,श्री.दामु अण्णा डुबे, श्री.संजय दौंडे,श्री.युसूफभाई, श्री.बबनराव ठाणगे, उपमुख्याध्यापक श्री.गणेशसिंग गौर, पर्यवेक्षिका सौ.ज्योती खैरनार,सह शिक्षक श्री.राजू शिंदे,श्री.जगन्नाथ अर्विकर,श्री.रायभान ठाणगे,श्री.सुनील लोंढे, श्री.संतोष शिंदे व श्री.रत्नाकर लांडगे,श्री. सतीश हाडे यांनी अथर्व अरूणराव उगले यांचे व मार्गदर्शक शिक्षक एन.सी.सी.विभाग प्रमुख चिफ ऑफिसर श्री.बाबासाहेब सोकटकर यांचे व अथर्वच्या पालकाचे अभिनंदन केले.