Home उत्तर महाराष्ट्र क्रांती – परिवर्तनासाठी विधायक संघर्ष..!

क्रांती – परिवर्तनासाठी विधायक संघर्ष..!

179

दलित, आदिवासी, शेतकरी याचा आवाज बुलंद करणारे व शाश्वत विकासासाठी जन आंदोलन उभे करणारे संघटन म्हणजे लोक संघर्ष मोर्चा

रावेर (शरीफ शेख)

उत्तर महाराष्ट्र व दक्षिण गुजरात मधील आदिवासी लोकांच्या न्याय हक्कांसाठी गेली 25 वर्ष लोक संघर्षचा लढा सुरू आहे. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त व देहली धरण प्रकल्पग्रस्तांच्या विकसनशील व न्यायपुर्ण पुनर्वसन, स्थलांतरित मजुरांना स्थानिक रोजगार मिळवून देणं असो , वनजमीनधारक आदिवासींना त्यांच्या शेतजमिनीचा मालकी हक्क मिळवून देणे असो की त्यांच्या नैसर्गिक संसाधनावर सामुदायिक अधिकार मिळवून देणे, महाराष्ट्रातील शेतकरी यांचा कर्ज माफीचा मुद्दा असो की हमी भावाची लढाई, मनरेगाची जनपक्षीय अमलबजावणी, गुजरातमधील तापीवरील उकाई प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व तेथील वन कायद्याची जनपक्षिय अमलबजावणी यात लोक संघर्ष मोर्चाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

वन कायद्याच्या निर्मितीच्या वेळी दिल्लीला तीन वेळा मोर्चे तर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जळगाव ते मुंबई ४५० किमी,(२०११) व ठाणे ते मुंबई(२०१८)५८ किमी बिरसा मुंडाने दिलेला नारा “उलगुलान ” करत आदिवासी शेतकऱ्यांचा हजारोंचा मार्च करत त्यांना न्याय मिळवून दिला.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनच्या वेळी उत्तरं महाराष्ट्रातील 85 हजार स्थलांतरित मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश व पश्चिम महाराष्ट्रातून आपापल्या गावी पोहचवले तर 3500 कुटुंबांना तीन महिने किराणा पुरवला तर जळगावमधील कोरोनामुळे वाढते मृत्यू व सरकारी बेजबाबदारपणाला वचक बसण्यासाठी औरंगाबाद हायकोर्ट याचिका दाखल केली व परप्रांतीय 1लाख 20हजार मजुरांना मायेची शिदोरी खावू घातली ,
तसेच शेतकरी,शेतमजूर, आदिवासी यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकसत्ता, सामना, लोकमत व पुण्यनगरीत प्रतिभाताई यांनी लिखाण केलं आहे.

प्रतिभा शिंदे ह्या लोक संघर्ष मोर्चाच्या संस्थापक असून त्यांनी समाजकार्यात आदिवासी विकास ह्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यात त्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गोल्ड मेडल प्राप्त आहेत. त्यांना कॉ दत्ता देशमुख पुरस्कार ,यशवंतराव चव्हाण पुरस्कार, रुक्मिणी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन यांनी सन्मानित करण्यात आले आहे.