Home मुंबई बालवाडी ते इयत्ता १२ वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण वेळापत्रक शिक्षणमंत्री यांच्याकडून जाहीर...

बालवाडी ते इयत्ता १२ वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण वेळापत्रक शिक्षणमंत्री यांच्याकडून जाहीर .

137

प्रतिनिधी – रवि गवळी

मुंबई – राज्यातील कोरना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार पहिल्यापासूनच ऑनलाईन शिक्षणासाठी अग्रही होते. त्यानुसार राज्य सरकारने राज्यात ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यास प्राधान्य दिले तसेच एका अर्थाने ऑनलाईन शैक्षणिक वर्ष सुरु केले. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आता थेट ऑनलाईन वर्ग वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील कोरोना व्हायरस स्थिती नियंत्रणात येत नाही. धोका पूर्ण टळत नाही तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार असल्याचे समजते.

ऑनलाईन शिक्षण वेळापत्रक महाराष्ट्र राज्य अं.क्र. इयत्ता वार शिक्षणाचा कालावधी शिक्षणाचे स्वरुप

(१) पूर्व प्राथमिक (बालवाडी)

सोमवार ते शुक्रवारप्रति दिन ३० मिनिटे. दोन वर्गपालकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद व मार्गदर्शन

(२) पहिली व दुसरी

सोमवार ते शुक्रवार प्रति दिन ३० मिनिटे. दोन वर्गपालकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद व मार्गदर्शन, उर्वरीत १५ मिनिटं विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण

(३) तिसरी ते आठवी

प्रति दिन ४५ मिनिटे. दोन वर्गविद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण

(४) नववी ते बारावी

प्रति दिन ४५ मिनिटे. चार वर्गऑनलाईन माध्यमातून शिक्षण

ऑनलाईन शिक्षणासाठी राज्यातील शाळांसाठी मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. विद्यार्थी हित व आरोग्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत आहे.

दरम्यान ज्या भागात शाळा सुरु करणे शक्य नाही अशा ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवणे शक्य आहे काय हे पाहावे. तसेच, ऑनलाईन शिक्षण सुरु करावे असे नियोजन राज्याच्या शिक्षण विभागाने केले आहे.