Home विदर्भ आज पालकमंत्री सुनिल केदार 24 जुलै रोजी वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर

आज पालकमंत्री सुनिल केदार 24 जुलै रोजी वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर

139

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २४. :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार आज 24 जुलै ला जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.

दुपारी नागपूर येथून वर्धाकडे प्रस्थान करतील. दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद सभागृह येथे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोंबर निमित्ताने आयोजित करावयाच्या कार्यक्रमा संदर्भात नियोजन बैठकीस उपस्थिती. दुपारी 4 वाजता सेवाग्राम विकास आराखडयातील बांधकाम झालेल्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीबाबत बैठक, दुपारी 4.30 वाजता सेवाग्राम विकास आराखडयातील कामांचा आढावा बैठक, सायंकाळी 5 वाजता एमगीरी येथे आयोजित करावयाच्या उद्योजकता परिषदेबाबत बैठक, सायंकाळी 5.30 वाजता महिला बचत गट (उमेद) व मविम बचत गटाच्या मेळाव्याचे नियोजन संदर्भात बैठक, सायंकाळी 6 वाजता पिक कर्ज वाटपातील लाभार्थी आढावा बैठक, सायंकाळी 6.15 वाजता राज्य परिवहन कर्मचारी संघटना कामगार भवन करीता शासकिय जमीन मिळणे बाबत चर्चा, सायंकाळी 6.30 वाजता नगर परिषद वर्धा मधील प्रभाग 14 मधील भूखंड क्र. 34 शिट क्रमांक 20 बाबत चौकशी संदर्भात बैठक, सायंकाळी 6.45 वाजता पुलफैल, आनंदनगर, अशोकनगर वर्धा येथील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरुपी पट्टे वाटप संदर्भात बैठक , सायंकाळी 7 वाजता नगर परिषद प्रभाग 10 मधील प्रस्तावित कामासंदर्भात बैठक सायंकाळी 7.30 वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रस्थान करतील.