Home जळगाव कार्याध्यक्ष विलास ताठे राष्ट्रवादी रावेर यांनी व्यंकय्या नायडू चा केला धिक्कार

कार्याध्यक्ष विलास ताठे राष्ट्रवादी रावेर यांनी व्यंकय्या नायडू चा केला धिक्कार

469

रावेर (शरीफ शेख )

काल उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या “जय भवानी, जय शिवाजी” या घोषणेवर आक्षेप घेतला,

“हे तुमचं घर नाही हे माझे चेंबर आहे, इथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत. तुम्ही नवीन आहात पुढच्या वेळी लक्षात ठेवा” असं व्यंकय्या नायडू म्हणाले, यावरून भाजपची छत्रपतींच्या बद्दल असलेली खोटी भावना पुन्हा स्पष्ट दिसली..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून संविधान लिहले आणि तुम्ही त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विरोध करताय, तुमच्यासाठी ती खुर्ची राजेंपेक्षा मोठी असेल पण ज्या जनतेने तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलंय ना त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे अस्मितेचा विषय आहेत.
भाजप वाल्यांनी यांनी एक पायंडाच पाडून घेतलाय
ठराविक वेळेनंतर छत्रपतींचा जाणीवपूर्वक अपमान करून महाराष्ट्राला कमकुवत करण्याचे.
तुम्ही नवीन आहात असं ते वेंकय्या नायडू बोलले,
उदयनराजे यांनी २००९, २०१४, २०१९ अशा लगातार तीन लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकून ते चौथ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेत होते.. आणि तुम्ही उदयनराजे यांना तुम्ही नवीन आहात, पुढच्या वेळी लक्षात ठेवा.. असं म्हणतात, यावरून चं तुमचा राजकारणात अभ्यास कमी आहे, हे तुम्हीचं सर्वांना जगजाहीर केले आहे,
तसेच खासदार कि शपथविधी सोहळ्यात हेमामालिनी राधे राधे म्हणतात, साक्षी महाराज,जय श्रीराम म्हणतात, आठवले,जय भीम म्हणतात, भाजपचे बहुतेक सर्व खासदार बेंचवरुन वंदे मातरम् घोषणा देतात,
यापेक्षाही ओवशी, अल्लाह हू अकबर जोराने म्हणतो,मग छत्रपती उदयनराजे भोसले यांनी, आपल्या बापजाद्याचे तसेच तमाम महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय घोष केला तर, बिघडले तरी कुठे,नी काय, का मिरच्या लागल्या तुम्हाला , जय भवानी जय शिवाजी या घोषणेने, मग का महाराष्ट्र राज्यांच्या निवडणुकीत का छत्रपती चा आशिर्वाद मागत होता, त्यांच्या नावाने मते चालतात, त्या रूपाने सत्ता स्थापन करतात,पण चालवतात मात्र हिटलर सारखीच, हुकुमशाही, दडपशाही सारखी, का नेहमीच महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी पाऊल उचलले जाते या भाजप कडुन कारण सत्ता संपुष्टात आली म्हणून कि केवळ सत्तेचे माज आलाय म्हणून, लोकशाही त सर्वांना आपला एक अधिकार आहे, तुम्हाला सत्ता दिली आहे,तर चांगले राजकारण करा, सर्व सामान्य जनतेच्या भल्यासाठी कामे, निर्णय घेतले गेले पाहिजे, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा भस्मासूर देशात
बोकाळला जात आहे, याकडे दुर्लक्ष करून, लाल किल्ला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले भाड्याने देण्याचे घाट घातलाय, सरकारची मालकीच्या कंपन्या, संस्था,स्वयता विदेशी कंपन्यांना विकत आहेत, सर्व दूर खाजगीकरण करून सामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे,कोरोना महामारी ने लाखों तरूण बेरोजगार आहेत, हजारोंच्या संख्येने उद्योग धंदे बंद झाले आहे, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत तरी तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करून, सत्ता स्थापनेसाठी वाटेल ते प्रयोग करीत आहात, महापुरुषांच्या बाबतीत वायफळ बडबड करीत आहात, यावरुन एकच सिध्द होते कि, भाजपला फक्त सत्ता लालसा तीव्र आहे, सर्व सामान्य जनतेविषयी संवेदनशीलता बिलकुल नाही, म्हणून चं मुद्दाम हून भाजप नेते महाराष्ट्र राज्यांच्या अस्मितेला धक्का लावण्याचे षडयंत्र रचण्यात गुंतले आहे.हे सत्य सर्वश्रुत दिसत आहे.
त्याचप्रमाणे व्यंकय्या नायडू यांनी जो उदयनराजे यांना दम भरला,व जय भवानी जय शिवाजी या घोषणेवर आक्षेप घेतला यांचा विलास ताठे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी रावेर यांनी जाहीर निषेध केला.