Home जळगाव अखेर त्या विशाल ला अटक व ५ दिवसाची पोलीस कस्टडी

अखेर त्या विशाल ला अटक व ५ दिवसाची पोलीस कस्टडी

31
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – भांडी धुण्यासाठी गेलेल्या त्या तांबापूर येथील अल्पवयीन मुलीस पळवून घेऊन गेलेल्या व दुसऱ्या दिवशी तिचे प्रेत मेहरून तलावात मिळून आल्या बद्दल रामानंद नगर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी स्वतः सदर प्रकरणी मा पोलीस अधीक्षक उगले साहेब यांच्या नेतृत्वात व सहा पोलीस अधीक्षक रोहन सर यांच्या मार्गदर्शना खाली प्राथमिक तपास करून रामेश्वर कॉलोनी मधील विशाल संतोष भोई यास अटक करून त्यास आज व्ही सी द्वारे श्री श.गु. ठुबे,जिल्हा न्यायाधीश ४, व अतिरिक्त न्यायाधीश यांचे समक्ष हजर केले .
न्यायालयात मात्र चौकशी अधिकारी अनिल बडगुजर यांनी अपराध विषयी व कोठडी का आवश्यक आहे या बाबत न्यायालयास मुद्दे पटवून दिले तर सरकारी अभियोक्ता केतन ढाके यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करून ७ दिवसाची कोठडी ची मागणी केली असता न्यायालयाने ५ दिवसाची कोठडी दिली.
रामानंद नगर पोलीस स्टेशन ला गुन्हा रजी क्र २७१-२० भा द वी ३६३-३०६ व पोकसो कलम १२ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
कोर्टात या वेळी फिर्यादी सुफीया बी,मयत चे वडील भिकन शाह,मावशी शमीम शाह,मामा आसिफ शाह,मावसा जावेद शाह सह शाह बिरदारीचे अनिस शाह,सिकलगर बिरदारीचे अझीझ सिकलगर, मानियार बिरदारीचे फारूक शेख हजर होते.
तसेच मुस्लिम ईदगाह चे संचालक एडव्होकेट सलीम शेख यांना सुद्धा फिर्यादी तर्फे फारूक शेख यांनी उभे केले होते.
फिर्यादी व त्याचे कुटुंब यांना अश्रू आले असता त्यांना फारूक शेख यांनी धीर देत संपूर्ण जळगावकर आपल्या सोबत आहेत व आपणास न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देण्यात आले.

Unlimited Reseller Hosting