Home जळगाव तब्लीग़ी जमात आणि मरकज़ – लियाकत शाह

तब्लीग़ी जमात आणि मरकज़ – लियाकत शाह

154

तब्लीग़ी जमात बद्दल बर्यािच लोकांच्या मनात शंका आहेत विशेतः ज्यांनी पहिल्यांदा हे ऐकले असेल किंवा जे आमच्या हिंदू किंवा दुसऱ्या धर्माचे बंधू आहेत त्यांनी भूतकाळातील तब्लीग़ी जमातची बातमी नक्कीच पाहिली असेल. बरेच प्रश्न आपल्या मनातही आले असेल, आपण मीडियाद्वारे बनविलेले नकारात्मक चित्र देखील पहिले आणि ऐकले असेल. तब्लीगी जमात म्हणजे काय, त्यात हजारो मुस्लिम का जमले आहेत, हे सर्व प्रश्न तुमच्या मनात येणे शक्य आहे. हे काय होते? तीथे क्या होतो हे प्रश्न तुमच्या मनातही येईल. आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची ओळख करुन देत आहोत. तबलीगी जमात ही एक मुस्लिम संस्था आहे. तब्लीग़ी जमातची स्थापना १९२६-२७ मध्ये झाली. याची स्थापना मौलाना इलियास यांनी केली होती. मुस्लिम धर्मातील लोकांमध्ये ईश्वर अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (त्यांच्यावर परमेश्वराची अपार कृपा असो) ची चर्चा सांगणे आणि मुस्लिम समुदायाच्या लोकांना ५ वेळा नमाज पाठण करणे आणि अल्लाहचे प्रेषित हजरत मुहम्मद (त्यांच्यावर परमेश्वराची अपार कृपा असो) त्यांची वाणी आणि संदेश लोकांण पर्यंत पोहचावा हा तब्लीग़ी जमातचा उद्देश असतो. प्रेषित हजरत मुहम्मदची जीवनशैली म्हणजे सुन्नत आणि तुम्ही नमाज कशी पठाण करयाचा? सुन्नत चा मार्ग काय आहे, या सर्व गोष्टी तब्लीग़ी जमातमध्ये घडतात आणि हा उपक्रम १०० वर्षांहून अधिक काळ हून चालू आहेत आणि आज पर्यंत हेच घडते. ज्याला आपण कुराण आणि हदीस देखील म्हणतो. तब्लीगी जमात काय करते? हा गट मुस्लिम समाजांना सामाजिक दुष्कर्मांपासून दूर करण्यासाठी आणि त्यांना इस्लामिक धर्माबद्दल अचूक माहिती देण्यासाठी कार्य करतो. इस्लामचा प्रसार करण्यासाठी आणि चांगल्या कार्याची अंमलबजावणी करण्यासाठी जमात लोकांमध्ये अहोरात्र काम करीत आहेत. तब्लीग़ी जमात दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन येथे असलेल्या मशिदीत सुरू झाली, ज्याला आता मरकज़ म्हणजे हेड ऑफिस म्हणतात. जसजसा वेळ गेला तसतसे जागरूकता देखील आली की आज तब्लीग़ी जमात हा जगातील सर्वात मोठी संगठना आहे. १९४० मध्ये, पहिल्यांदाच तब्लीग़ी जमातने दिल्ली जवळील मेवात या भागात अल्लाह आणि त्याचे प्रेषित हजरत मुहम्मद (त्यांच्यावर परमेश्वराची अपार कृपा असो) यांचे शब्द पसरवण्यासाठी सर्वत्र प्रचार सुरू केला. तब्लीग़ी जमात म्हणजे काय? तब्लीग़ीचा शब्दाचा अर्थ अल्लाहचे शब्द आहेत आणि जमात म्हणजे गट किंवा. दिल्ली मरकज़ म्हणजे मशिद म्हणजे म्हणजे कोणत्याही शहरात मशिदीला मरकज़ बनवले जाते. जेथे इस्लामची चर्चा पसरवण्याचे काम तब्लीग़ी जमातचे लोक करतात. निजामुद्दीन मरकज़ हे दिल्लीतील मशिदीत आहेत. हे कोठेही जाण्यापूर्वी प्रथम मरकज़मध्ये जमा होतात. त्यानंतर आठ-दहा जणांचा समूह किंवा त्याहून अधिक लोक शहर आणि खेड्यांकडे, गावं जिल्ला राज्य कडे वळतात. यानंतर या गावांमध्ये इस्लाम शिकवा आणि ३ दिवस, १० दिवस किंवा ४० दिवस त्यांच्या मुस्लिम भाऊ सोबत इस्लामी शिक्षणसाठी ते कोणत्याही गावं जिल्ला किवाह राज्य आणि विविध देशांच्या ठिकाणी इस्लामचा प्रसार करण्यासाठी बाहेर सुद्धा प्रवास करतात. आणि विशेष म्हणजे जे कोणी तब्लीग़ी जमात चे कुठे ही प्रवास करतात त्यांची नोंद आणि पंजीकरण करून घेतात Registration with authentic documents and verifications तब्लीग़ी जमातशी संबंधित असलेल्या सर्व लोकांची नोंदणीकरणे बंधनकारक असते, म्हणजेच प्रत्येक गावात, शहर, तालुका, जिल्हा किंवा देशातील प्रत्येक कायदेशीर कारवाईच्या हिताच्या दृष्टीने असलेल्या अस्सल कागदपत्रांच्या पडताळणीसह नोंदणी करतात. याचा पुरावा प्रत पुराव्यासाठी एकत्र ठेवला आहे, कोणतेही काम बेकायदेशीरपणे केले जात नाहीत, कारण अल्लाह हराम कामाला पसंद करत नाहीत, तर सर्व हलाल कामांना आवडतो. आणखी एक गोष्ट म्हणजे तब्लीग़ी जमातशी संबंधित बरेच लोक बाहेरून आदराने येत आहेत, कोणत्याही बॅनर किंवा पोस्टर्सबाबत माहिती नसते. लोकांना फक्त एक शब्द दिला जातो, केवळ तब्लीग़ी इज्तेमा आणि लोक स्वत: येतात जिथे त्यांना अल्लाह आणि पैगंबर हजरत मुहम्मद (त्यांच्यावर परमेश्वराची अपार कृपा असो) जे अल्लाहचे प्रेषित आहेत आणि ५ वेळा नमाज प्रार्थना करतात. त्याच मंडप किंवा मस्जिद मध्ये स्वताचे शिकवतात. मग शेवटच्या दिवशी एक संध्याकाळ, ज्यामध्ये सर्व देशवासीयांना देशाच्या शांतता आणि समृद्धीसाठी दुवा म्हणजे प्रार्थना करण्यास सांगितले जाते. अलीकडेच, कोरोनाच्या रोग मुळे देशात लॉक डाऊन करण्यात आला. निजामुद्दीन मरकझच्या कित्येक लोकांची तपासणी केल्यानंतर काही सकारात्मक प्रकरणे समोर आली. तर बर्याचच ठिकाणी त्यांच्याशी संबंधित प्रकरणे जवळपास शून्य आहेत. जमातचे लोक इज्तेमा मस्जिदमध्ये अल्लाह आणि प्रेषित हजरत मुहम्मद (त्यांच्यावर परमेश्वराची अपार कृपा असो) अल्लाहची प्रार्थना केल्यानंतरच त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्याच वेळी नमाज जमातबरोबर उपासना आणि अध्यापन देखील करतो. जेव्हा इज्तेमा संपेल, तेव्हा प्रत्येकजण आपल्या स्वतःचे वस्तू घेऊन त्यांच्या घरी परत जातात. हे सर्व तब्लीग़ी जमातचे लोक नेमका अल्लाहचे लोक असतात आणि जगाशी त्यांचा जास्त संबंध नसते. ते ईश्वर अल्लाहची उपासना करतात अधिक वेळ चिंतन आणि जिक्र मध्ये घालवतात. जर कोणाच्या मनात शंका असेल तर मरकज़ किंवा इज्तेमा मध्ये काय होते हे समजून घेण्यासाठी तो पूर्णपणे मोकळ्या मनाने बिंदास येऊन जाणवू शकतो. इस्लाम धर्म वास्तवात शांतता, प्रगती, दया आणि सद्भावनाचा धर्म आहेत जो देशावरील प्रेम आणि सर्व विश्वासणा यांना प्रेम आणि बंधुभाव शिकवते. सर्व लोकांनी आणि ज्यांना शंका असेल त्यांनी सुद्धा कुरआन भाषांतर स्वतःच वाचा आणि इस्लाम कसा आहेत हे समजून घ्या. इस्लाम हा साधेपणाचा धर्म आहे. जर तुम्हाला इस्लाम समजला असेल, तर इतरांनाही समजावून सांगा, तरच ईश्वर अल्लाहची मदत तुम्हाला सर्व बाजूंनी नक्कीच येईल इंशाल्लाह.लियाकत शाहएम.ए बी.एड
महाराष्ट्र राज्य कार्यकारी समिति सदस्य,
अखिल भारत जर्नालीस्ट फेडरेशन