Home विदर्भ … आणि ‘त्या’ मनोरुग्णाच्या मदतीला सरसावले माँ कृपा फाउंडेशनचे युवक

… आणि ‘त्या’ मनोरुग्णाच्या मदतीला सरसावले माँ कृपा फाउंडेशनचे युवक

26
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ – शहरातील हनुमान आखाडा चौक येथे पांढुरकी दाढी, डोक्यावरचे वाढलेले केस,अंगावर फाटलेले कपडे असलेला एक माणूस त्याला कशाचीही फिकीर वाटत नव्हती. मातीशी खेळत बसलेला हा मनोरुग्ण असल्याचे शहरातील काही तरुणांच्या लक्षात आले.
लगेच त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या माणसाची समजूत घालून त्याची दाढी व केशकर्तनाची व्यवस्था केली. त्याला अंघोळ घालून दिली.त्याच्या पोटाची व्यवस्था करून दिली.
कोरोना सारख्या महामारीमुळे सगळं जग एकीकडे झुंजत असतांना पहिले भीक मागून व अन्न मागून,अश्या अनेक लोकांचा उदरनिर्वाह सुरू होता. पण लॉकडाऊन नंतर सर्व धार्मिक-घरघुती कार्यक्रम बंद झाले. सर्व धर्मांची धर्मस्थळे ही बंद आहेत.इतकंच काय तर लोकांचं बाहेर पडनही बंद आहे,त्यामुळे शहरातील अनेक भागात ज्यांचं कोणीही नाही अश्या लोकांची मोठी संख्या आढळून येते.अश्याच प्रकारे हा माणूस कुठून तरी आला असावा आणि परिस्थिचीचा आघात सहन करत असावा अश्या जाणिवेतून यवतमाळतील माँ कृपा फाउंडेशनचे ललीत जैन, राजू गोरे, डॉ रिषभ बोरा, राजू मदनकर, योगेश लोदीलवार, प्रद्युम्न जवळेकर, पवन अराठे, मनीष देशपांडे, प्रशांत शेटे, आनंद जयस्वाल, हरी देउळकर आदींनी त्या मनोरुग्णाचे दुःख हेरले.

शहर पोलीस स्थानकाचे ठाणेदार धनंजय सायरे यांनाही याठिकाणी पाचारण करण्यात आले. या मनोरुग्णाची अवस्था पाहून त्यांनीही त्यांच्या वतीने विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या त्याला कपडे,टोपी आणि मास्क ची सोय करून दिली. एकीकडे माणुसकी हरवत जाते आहे अशी चिन्हे असतांना माणसाला माणुसकीची जाणीव आजही आहे आणि ती कायम राहीलच हाच संदेश या युवकांनी दिला.

Unlimited Reseller Hosting