जळगाव

निर्मल सीड्स ने ५०० कुटुंबांसाठी “आर्सेनिक अल्बम ३०” या होमिओपॅथी औषधीचे केले वाटप

निखिल मोर

पाचोरा – जगभर थैमान घातलेल्या covid-१९ कोरोना विषाणूच्या युद्धात आपण सर्व सहभागी होऊन सामूहिकपणे लढा देत आहोत. कोरोना विषाणूला हरविणे हे आपले अंतिम लक्ष असून त्यादृष्टीने आपले सर्वस्वी प्रयत्न सुरू आहेत. निर्मल सिड्स चा प्रत्येक कर्मचारी हा निर्मल परिवारातील घटक असून निर्मल सीड्स सदैव कर्मचार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. म्हणूनच कोरोनाच्या या गंभीर काळात कंपनीने यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सॅनीटायझर्स आणि मास्कचे वितरण केले आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा धोका लक्षात घेऊन निर्मल सिड्सने सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाची काळजी म्हणून सुमारे ५०० कुटुंबांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधीचे वितरण करून कार्पोरेट क्षेत्रात सामाजिकतेचा आदर्श घालून दिला आहे.

या वैश्विक संकटाला तोंड देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच निर्मल सिड्सने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी १५लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १८ लाखाची भरभरून मदत केली आहे. त्याचबरोबर पाचोरा व भडगाव शहरातील आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, प्रशासकिय यंत्रणा तसेच पाचोरा शहरातील सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्व पत्रकार बांधवांना तसेच पाचोरा बसस्थानकातील सर्व वाहक व चालक बांधवांना मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर्स आणि मास्क चे वितरण केले आहे. त्याचबरोबर पाचोरा शहरात तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पोलीस स्टेशन, रुग्णालय यातील सर्व कर्मचा-यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून पाच निर्जंतुकीकरण कक्ष चे ही वितरण केले आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

जळगाव

सोशल डिस्‍टन्‍सींगचे पालन करणे, मास्‍क न वापरणे इ.कारणांसाठी मुख्‍याधिकारी यांची दंडात्‍मक धडक कार्यवाही

निखिल मोर पाचोरा – सार्वजनीक आरोग्‍य विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील अधिसुचना कोरोना/2020/प्र.क्र.58/आरोग्‍य-5 दि.14/03/2020 नूसार जिल्‍हयात ...
जळगाव

कर्नाटकातील “त्या” जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुनर्स्थापित करा अमळनेरात महाविकास आघाडीचे तहसिलदारांना निवेदन

अमळनेर – कर्नाटकातील बेळगांव जिल्ह्यातील मनगुत्ती गांवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुन्हा त्या जागेवर ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जळगाव

कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या पोलिस पाटील उल्हास लांडगे यांच्या वारसास मिळावी ५० लाख विम्याची रक्कम…

जळगाव पोलिस पाटील संघटनेकडून विविध मान्यवरांना देण्यात आले निवेदन… अमळनेर :- कोविड १९ अंतर्गत सेवा ...
जळगाव

अमळनेर येथील कोविड सेंटरमधून सकाळी बाधित रुग्ण बेपत्ता… संध्याकाळी रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळला मृतदेह..

अमळनेर :- येथील कोविड सेंटर मधून काल दि. १० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बेपत्ता ...
जळगाव

अमळनेर येथे विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा…प्रा .साळुंके यांनी क्रांतिवीर समशेरसिंग सिंग पारधी स्मारक ठिकाणी बसण्याचे बाक दिले भेट….

अमळनेर प्रतिनिधी विश्व आदिवासी दिवस अमळनेर येथे विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. आज सकाळी ...