Home महत्वाची बातमी
55
0

अन त्या हिंदू समाजाच्या वयक्तीवर मुस्लिम तरुणाने केले अंत्यसंस्कार ????

परिणाम लोकडाऊन चा ,

अमीन शाह

जेजुरी (पुणे) : जुनी जेजुरी येथील एका निराधार ज्येष्ठाचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे गेल्या वर्षी अपघातात निधन झाले होते. तसेच, त्यांची दूरवर राहणारी मुलगी व सून लॉकडाउनमुळे अंत्यविधीसाठी येऊ शकली नाही. लॉकडाउनमुळे शेजारील लोकही बाजूला झाले. अशावेळी येथील एका मुस्लीम तरुणाने मानवता हाच धर्म, याचे आचरण करत या निराधार व्यक्तीवर हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले.

साहिल बाबाजी मुंडे (वय 21), हे या मुस्लीम परिवारातील तरुणाचे नाव आहे. त्याचे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील आहे. रोजगारानिमित्त ते 20 वर्षांपूर्वी जुनी जेजुरी परिसरात स्थायिक झाले. साहिल सध्या शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात शिक्षण घेत असून, तो राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी आहे. त्याचबरोबरच तो कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एका मेडिकलमध्ये काम करतो.

निराधार असणारे शिवाजी बाबर (वय 74) हे जुनी जेजुरीत राहत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा संतोष यांचा गेल्या वर्षी अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे सून व नातवंडे माहेरी राहण्यास गेली. मुलगी लग्न झाल्याने फलटण येथे राहत आहे.
शिवाजी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मात्र, त्यावेळी त्यांचे कोणीही नातेवाईक येथे नव्हते. मुलगी आणि सून लॉकडाउनमुळे बाहेरगावावरून येऊ शकत नव्हते. अशा वेळी त्यांच्या मुलीची परवानगी घेऊन साहिल मुंडे हा तरुण मानवतेच्या भावनेतून शिवाजी बाबर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे आला. त्याने हिंदू रिवाजानुसार शिवाजी बाबर यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पुढील सर्व विधीही तो करणार आहे.
जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, शिवाजी जगताप, निखिल शिवरकर, गणेश डोंबे, गोरख कामठे, रोशन जाधव या तरुणांनी साहिलला मदत केली. साहिलने दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक होत आहे. जेजुरी येथील शरदचंद्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा चाफळकर यांनीही त्याचे कौतुक केले.