Home जळगाव पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

396

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार,ठोस प्रहार च्या संपादिका प्रा जयश्री दाभाडे यांची सेवक सेवा भावी संस्था जळगाव यांनी महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदर पुरस्कार हा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव दरम्यान आपत्ती व्यवस्थापन काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी साठी प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.यात अमळनेर तालुक्यातुन प्रा जयश्री दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रा. जयश्री दाभाडे या कोव्हीड 9 च्या आपत्ती व्यवस्थापन काळात सातत्याने कार्यरत आहेत. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी 7 लोकांचे गरीब आणि गरजू कुटुंब देखील दत्तक घेतले आहे. त्याच प्रमाणे अत्यन्त जलद आणि विश्वसनीय बातम्या त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनते पर्यंत पोहचविल्या आहेत.फक्त पत्रकारिता न करता त्या पलीकडे जाऊन सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावण्या कडे त्यांचा कल असतो त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन काळात त्यांनी अनेक सामान्य नागरिकांचे प्रश्न समस्या सोडविल्या आहेत.कोव्हीड केअर सेंटर ला भेट देत पॉझिटिव्ह रुग्ण आणि कोरेन्टाईन संशयित रुग्ण यांच्याशी सातत्याने संवाद साधत असून त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न शील आहेत.
कोव्हीड 19 च्या आपत्ती व्यवस्थापन काळात कौटुंबिक हिंसाचार आणि समस्या वाढल्या आहेत या अनुषंगाने प्रा जयश्री दाभाडे ह्या येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल घेत असून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न शील आहेत.आज पर्यंत अनेक महिलांच्या समस्या सोडविल्या असून महिलांचे समुपदेशन करत आहेत.
याच बरोबर आपले शैक्षणिक कार्य आणि अकॅडेमिक कार्य देखील करत आहेत.राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य पातळीवर ऑनलाइन वेबिनार मध्ये सहभागी होत आहेत. तर राज्य पातळीवरील वेबिनार मध्ये संशोधक वक्ता ,की नोट स्पीकर म्हणून कोव्हीड 19 संदर्भात माहिती देऊन समुपदेशन करत आहेत.
त्यांच्या या विविध अंगी कार्याची दखल घेत सेवक सेवा भावी संस्थेने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरविले असून या संदर्भाचे निवड पत्र प्रा दाभाडे यांना दिले आहे. लवकरच प्रमाणपत्र,मानचिन्ह देऊन त्यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, व्यापारी वर्गातून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.