Home जळगाव कासोदा येथील एटीएम मध्ये पैसे नसल्याने ग्राहकांचे हाल

कासोदा येथील एटीएम मध्ये पैसे नसल्याने ग्राहकांचे हाल

86
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील कासोदा तालुका एरंडोल
येथील एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. पैसे नसल्याने नागरिकांना सेन्ट्रल बँकेत जावे लागत असून तेथे पैसे काढणार्यांची गर्दी होत असल्याने कोरोना विषाणूचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच येथील असलेले एटीएम गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून बंद असल्याचे समजले. याबाबत चौकशी केली असता एटीएममध्ये पैसे टाकणार्या कंपनीचा करार संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकांमध्ये सेन्ट्रल बँकेविषयी संताप व्यक्त होत आहे. उर्वरित युनियन बँकेचे व टाटा इंडिकॉमचे एटीएम मध्ये पैसे नसल्याने ग्राहकांची नाराजी व्यक्त होत आहे. बँकांनी बँकेतील गर्दी कमी करण्यासाठी एटीएममध्ये पैसे टाकण्याची आवश्यकता असतांना एटीएममध्ये पैसे न टाकणे म्हणजे बँकेचा बेजबाबदार पणा दिसत अाहे. एकीकडे एटीएम वरील व्यवहाराची मर्यादा काढल्यामुळे एटीएम कार्ड धारकांचा कल एटीएम कडे वाढलेला दिसत आहे.