Home मराठवाडा देगलूर ला जिल्ह्याचा दर्जा मिळविण्यासाठी देगलुरात होणार अभूतपूर्व जनआंदोलन

देगलूर ला जिल्ह्याचा दर्जा मिळविण्यासाठी देगलुरात होणार अभूतपूर्व जनआंदोलन

142

नांदेड / देगलूर , दि. ०५ :- ( राजेश भांगे ) राज्यात नवे 22 जिल्हे आणि 49 तालुके करण्याचा मनोदय महाविकास आघाडी सरकारने जाहीर करताच नांदेड जिल्ह्यात नवे तालुके व नव्या नव्याने जिल्हा निर्मिती करण्याच्या मागणीला वेग आला आहे .

भाजपा सरकारने नव्या जिल्हा निर्मितीसाठी समिती गठित केली होती ज्यात विभागीय आयुक्त यांचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. राज्यातील सहा महसूल आयुक्तालयामध्ये नव्याने जिल्हे करण्याविषयी संबंधित आयुक्त नव्याने अहवाल ठाकरे सरकारला देणार आहेत त्यामुळे देगलूरलाही जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. दोन फेब्रुवारीच्या देगलूर जिल्हा निर्मिती संदर्भात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बैठकीत तरुण सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे देगलूरकर यांनी देगलूर हे महत्वाचे व्यापार केंद्र व तीन राज्याच्या सीमेवरील महत्वाचे उपजिल्हा शहर असून ह्याचा व्हावा तसा विकास न झाल्यामुळे आतातरी देगलूर तालुक्यास न्याय देत विकासाचे कार्य होण्यासाठी देगलूर ला जिल्ह्याचा दर्जा देण्यासंबंधी भाष्य केले व मागणी पूर्ण न झाल्यास अभूतपूर्व आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहन केले.
अशोक कांबळे यांच्याद्वारे देगलूर जिल्हा नवनिर्माणसाठी सर्वप्रथम समाज माध्यमावर विषय चर्चेत आल्यानंतर वास्तविकतेचे भान राखत नेते व कार्यकर्ते या मागणीला जोर येत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर ला जिल्हा करून त्यामध्ये देगलूर चा समावेश होणार असल्याची बातमी चर्चेत आल्यानंतर देगलूर घरांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. स्थानिक निष्क्रिय लोकप्रतिनिधी व नांदेडचे पालक मंत्री नामदार अशोक चव्हाण व त्यांच्या पिताश्री देगलूरच्या जनतेवर दशकानुदशके विकासाच्या बाबतीत पिछाडीवर ठेवले असल्यामुळे सर्वात जुना तालुका असूनही तसेच निजाम काळापासून एक मोठी व्यापारपेठ व भौगोलिक क्षेत्र उपविभागीय कार्यालय दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या अगोदरपासून येथे कार्यरत आहेत. देगलूर समाजवाद्यांचा गढ होता व काँग्रेस संस्कृतीचा प्रचार विरोधात येथील जनमत मतदारसंघ पूर्ण स्थापन होईपर्यंत कायम होते. परंतु 2009 पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर येथील जनतेने काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना विजयी करून काँग्रेस संस्कृतीचा स्वीकार केला व काँग्रेसचे नेतृत्व मान्य केले परंतु पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे देगलूर विकासापासून दूरच राहत आहे. त्यामुळे आता विकासाचे दार उघडण्यासाठी देगलूरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा या मागणीला अशोक कांबळे यांच्यासह नगरसेवक राजकीय पदाधिकारी व नागरिकांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी भाजपचे शंकर राठोड सत्य स्वच्छता जागर ग्रुपचे सत्यनारायण नागोरी विजय यांना नगरसेवक शैलेश पवार नगरसेवक बाळू काकडे जगदीश वरखंडे विश्व परिवाराचे कैलास के सूर्यवंशी मनसेचे प्रवीण म्हणाले विकास नरबा घे खंडेराव गवलवाड बालाजी महिला गिरी आदित्य बनसोडे मारोती गंगाधर वाघमारे शेख शकील प्रकाश गवलवाड माधव तेलंग गंगाधर संग्राम हनुमाने जावेद शेख असलम रमेश खंदारे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती याप्रसंगी सर्वपक्षीय कृती समितीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी श्री अरुण डोंगरे यांना भेट घेऊन त्यांच्या त्यांना देगलूर ला जिल्हा दर्जा देण्यात यावा या आशयाचे निवेदन देण्याचे बैठकीत ठरले असे अशोक कांबळे त्यांनी सांगितले.