Home महत्वाची बातमी आसेगाव देवी येथे इंडियन एक्सप्रेसच्या दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार श्रीमती निरजा चौधरी...

आसेगाव देवी येथे इंडियन एक्सप्रेसच्या दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार श्रीमती निरजा चौधरी यांची भेट.

147

यवतमाळ / बाबुळगाव – मागील चार वर्षापासून महात्मा गांधी आरोग्य आयुर्विज्ञान संस्थान सेवाग्राम ,युनिसेफ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला बाल विकास विभागामार्फत 0 ते 3 वर्ष वयोगटांच्या बालकांचे संगोपन साठी पालकांचे सक्षमीकरण करण्यासाठी आरंभ नावाचा उपक्रम सुरू झाला.


हेच काम गाव पातळी किती रुजले, कसे सुरू झाले व त्याचा कितपत फायदा बालकांना व पालकांना झाला.कोणकोणते फायदे त्या कामातून दिसून येत आहे आसेगाव देवी येथे बघण्यासाठी दिल्ली येथील श्रीमती निरजा चौधरी पत्रकार इंडियन एक्सप्रेस यांनी भेट दिली.
या दरम्यान त्यांनी 13 महिन्यांच्या बालकासाठी अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्याकडून होणारी गृह भेट दिली व त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये 06 महिने ते 12 महिन्याचा बालकांच्या पालकांची पालक सभा घेतली.
या अंगणवाडी सेविका, आशा, अंगणवाडी सुपरवायझर, आशा सुपरवायझर, आशा समूह संघटक यांचा आरंभ या उपक्रमाच्या कार्याबाबत चर्चेच्या माध्यमातून माहिती घेतली तसेच पालकांशी व सरपंच यांच्याशी चर्चा करून आरंभ उपक्रम बाबत आधारित झालेले बदल जाणून घेतले, यावेळी शर्मिला मुखर्जी (सल्लागार युनीसेफ महाराष्ट्र ) डॉ.अभिषेक राऊत, प्रोफेसर एम.जी.आय.एम. सम्राट खंडार , राजकुमार बसेकर , प्रशिक्षण जिल्हा संपर्क अधिकारी आरंभ टीम राहुल पेठे,(एमएससी ऑफिसर ) डॉ. सोनू मेहेर (प्रकल्प समन्वयक न्यूट्रिशन ब्युरो महाराष्ट्र शासन ) आसेगाव देवी येथील सरपंच सचिन चव्हाण,अंगणवाडी सेविका प्रतिभा चव्हाण,पुष्पा गावंडे, सौ.भगत ताई सुवर्णा कुयटे, सौ. माईदे, माला राठोड, शारदा घाटोळे रेखा चव्हान सविता उडाखे इत्यादी उपस्थित होते.