Home मराठवाडा भारत बंद ला परतुरमध्ये संमिश्र प्रतिसाद…

भारत बंद ला परतुरमध्ये संमिश्र प्रतिसाद…

35
0

परतुर प्रतिनिधी – लक्ष्मीकांत राऊत

जालना , दि. २९ :- विविध संघटनांनी सिएए च्या विरोधात पुकारलेल्या भारत बंद च्या आव्हानाला बुधवारी परतुरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुस्लिम समाजातील व्यापारी वर्गाने मात्र आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली. शहरात भारत बंद च्या पाश्वभूमीवर विविध संघटना च्या वतीने बंद चे आवाहन करण्यात आले होते.

मात्र सकाळी दोनचार तास बंद यशस्वी झाला, नंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले. आष्टी रेल्वे गेट ते तहसील कार्यालय दुपारी12 वाजता मोर्चा काढण्यात आला होता, तहसील कार्यालयाच्या समोर मोर्चा चे रूपांतर सभेत झाले यामध्ये काही स्थानिक वक्त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा त मोठ्या संख्येने मुस्लिम समाज सामील झाला होता तर इतर काही दलित संघटना चे कार्यकर्ते सहभागी होते.

दुपारी 12 ते 1 वाजल्यापासून व्यापारी वर्गाने आपआपली दुकाने उघडून व्यवहार सुरू केले.परतुर च्या गावं भागात मात्र बंद ला चांगला प्रतिसाद मिळालेला दिसला.बंद च्या निमित्ताने शहरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Unlimited Reseller Hosting