Home मराठवाडा बीड जिल्हा सायबर पोलिस चे उत्कृष्ट कार्य केबीसी च्या नावाखाली लुटणारे या...

बीड जिल्हा सायबर पोलिस चे उत्कृष्ट कार्य केबीसी च्या नावाखाली लुटणारे या चार आरोपी अटकेत

206

 

बीड : केबीसीच्या नावाने फोन, व्हिडिओ कॉल करुन २५ लाखांची लॉटरी लागली, कार लागली असे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी बीड पोलीसांनी पाटणा बिहार राज्यातून जेरबंद केली. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल बीड पोलीसांचे अभिनंदन केले जात आहे.

बीड शहरातील फिर्यादीचा ११/ १२ / २०२१ मोबाईल नंबर केबीसी नावाच्या ग्रुपमध्ये समाविष्ट केला. यानंतर फिर्यादीच्या मोबाईल नंबर वर कॉल, व्हिडिओ कॉल करुन २५ लाखांची लॉटरी लागली आहे तसेच कारही बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून टॅक्स व जीएसटी म्हणून वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकवरुन फोन करून तसेच विविध बँक अकाऊंटवर भरण्यास सांगून तब्बल २९ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रारीवरुन ( दि. ३ मार्च ) बीड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर हा गुन्हा बीड सायबर पोलीसांकडे वर्ग करण्यात आला. या गुन्हयाचा तपास हा अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचा होता. हे आव्हान स्वीकारून सायबर पोलीसांनी तांत्रीक पध्दतीने अहोरात्र मेहनत घेऊन गुन्हयातिल आरोपीनां तीस दिवसात निष्पन्न केले. साहील रंजन भिक्षुककुमार वय २१ रा . पुर्व इंदिरानगर , रोड नं . 4 कनकरबाग , सम्पतचक लोहीयानगर , पाटणा , राज्य बिहार , संतोषकुमार सिध्देश्वरकुमार शर्मा वय २१ वर्ष रा . पीसी 548 विद्यापुरी कंकरबाग सम्पतचक , पाटणा राज्य बिहार, अमनराज राजकुमार वय २१ वर्ष रा . पुर्व इंदिरानगर पोस्ट लोहीयानगर , रोडनं . 4 कंकरबाग पाटणा, राज्य बिहार, अतुलकुमार गौतमकुमार सिन्हा वय २० वर्ष रा . आंबेडकरचौक हनुमाननगर कंकरबाग पाटणा , बिहार यांना जेरबंद केले. या आरोपीनी गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे . वरील आरोपीकडुन हार्डडिस्क , वायफाय मोडेम , पाच मोबाईल , फिंगरप्रिंट स्कॅनर , इत्यादी साहीत्य जप्त करून आरोपीना ( दि २ एप्रिल ) अटक करण्यात आली . सदर आरोपीना मा . न्यायालय , बीड येथे रिमांडसह हजर केले असता , मा . न्यायालयाने आठ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे . वरील आरोपीची चौकशी चालु असून आणखी आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे . तसेच गुन्ह्यातिल फसवणुक झालेली रकमेचा तांत्रीक पध्दतीने शोध घेणे सुरु आहे. सदरील कामगीरी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड , पो . उपनि जाधव , पो.ह. जायभाये , पो.ना. आसेफ शेख , अनिल डोंगरे , विजय घोडके , अन्वर शेख , बप्पासाहेब दराडे , पंचम वडमारे , संतोष म्हेत्रे , प्रदिपकुमार वायभट व महीला पोलीस अंमलदार शुभांगी खरात सर्व सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केली आहे .